लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. गृहास्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर तुमचा संसार हा जोडीदारावरही अवलंबून असतो. योग्य जोडीजार मिळाला तर संसार सुखाचा होईल यात शंका नाही. मात्र जर हीच व्यक्ती तुम्हाला पुरक नसेल तर तुमचं पुढील संपूर्ण आयुष्य जगणं कठीण आहे. हेल्दी रिेलेशनशिपकरिता तुमचा जोडीदार सकारात्मक विचारांचा असणे अतिशय गरजेचे आहे. 


तुमचे विचार महत्त्वाचे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, मला योग्य जोडीदार का मिळत नाही? या प्रश्नावर श्री श्री रविशंकर यांनी दिलेलं उत्तर जाणून घेणं अतिशयम महत्त्वाच आहे. रविशंकर यांनी सांगितले की, प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्या जोडीदारासाठी कशी जबाबदार असते. 'अनेकदा योग्य किंवा अयोग्य जोडीदाराची निवड आपल्याच वाईव्सवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर आपले विचार सकारात्मक असेल, आपण चांगले विचार करतो, तर निश्चितपणे आपण सकारात्मक असलेल्या लोकांकडे आकर्षित होतो. परंतु जर आपली Vibes नकारात्मक, संशयास्पद आणि लोभाने भरलेली असतील तर आपण केवळ आपल्यासारख्याच Vibes असलेल्या लोकांशीच संबंध ठेवतो. म्हणूनच, जर तुम्हाला योग्य जोडीदार हवा असेल तर प्रथम तुमचे विचार सुधारा.


एकाच विचारांचे लोक येतात एकत्र 


पुढे श्री श्री रविशंकर म्हणाले, 'एक इंग्रजी म्हण आहे की, बर्ड्स ऑफ द सेम फैदर फ्लॉक्स टुगेदर म्हणजे एकाच विचारांचे लोक एकत्र येतात. म्हणून सर्वप्रथम आपल्याला आपल्या विचारांवर काम करावे लागेल आणि सामान्यतः लोक या गोष्टीकडे फारच कमी लक्ष देतात. कारण तुमची विचार, आवडी-निवडी, व्यक्तिमत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे असतात. 



कसा कराल बदल? 


तुमची vibes बदलण्यासाठी सर्वोत्तम आणि प्रभावी मार्ग म्हणजे तुमचा विचार सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करणे. आयुष्यात काही चुकीचे घडत असले तरी त्यातून काही सकारात्मक कसे घडले हे शोधा. एखाद्या व्यक्तीला भेटताना, प्रथम तिच्यातील दोष शोधण्याऐवजी त्याच्या/तिच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही हा सराव पुन्हा पुन्हा कराल तेव्हा तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनेल. 


लालसा, अहंकार दूर ठेवा


लालसा आणि अहंकार या दोन्ही गोष्टी तुमचं संपूर्ण आयुष्याची वाट लावू शकतात. मग ती व्यक्ती मनातून कितीही चांगले असाल तरी या दोन दुर्गुणांमुले तुम्ही चांगल्या गोष्टी गमावू शकता. कारण चांगल्या व्यक्तींना आकर्षित करण्यासाठी मुळातच तुमचे विचार आणि गुण चांगले असणे अत्यंत गरजेचे असते.


संशय 


स्वत:वर संशय किंवा दुसऱ्यावर संशय घेण्याची सवय, या दोन्ही गोष्टी नाते तोडण्यासाठी पुरेशा असतात. आणि हे केवळ जोडप्यांनाच नाही तर प्रत्येक प्रकारच्या नात्याला लागू होते. संशयास्पद स्वभावाची व्यक्ती नेहमी गोष्टींमध्ये नकारात्मकता पाहते आणि कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यास असमर्थ असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये विश्वास ठेवण्याची क्षमता नसते, तेव्हा कोणी त्याच्याबरोबर कसे जगू शकेल.