Vat Purnima 2024 : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणि अमावस्या येते. धर्मशास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली विवाहित महिलांना वेध लागतात ते वट पौर्णिमेचे. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा साजरी करण्यात येते. यादिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला उपवास करतात आणि वडाची पूजा करतात. या पूजेसाठी महिला खास साज श्रृंगार करतात. हिंदू धर्मात साडी ही एक पारंपरिक वेशभूषा आहे. त्यामुळे महिला शुभ कार्यासाठी साडी परिधान करतात. (Vat Purnima 2024 Dont wear these 3 color sarees astrology in mararhi)


कधी आहे वटपौर्णिमा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा ज्येष्ठ वट पौर्णिमा ही 21 जून 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. 


हेसुद्धा वाचा - वटसावित्रीचा उपवास करताना काय खावं? काय खाऊ नये?


वटपोर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या?


ज्योतिषशास्त्रात तुमच्या कपड्याचे रंगालाही विशेष महत्त्व आहे. पूजेचे पूर्ण पुण्य प्राप्त करण्यासाठी योग्य रंगाचे कपडे परिधान करणेही महत्त्वाचे असतं. त्यामुळे वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसू असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या कुठल्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाते. लाल,  हिरवा, पिवळा, जांभळा, गुलाबी अशा कोणत्याही कलरफूल साड्या तुम्ही वटपौर्णिमा पूजासाठी नेसू शकता. 



'या' रंगाच्या साड्या अजिबात नेसू नका!


जसं ज्योतिषशास्त्रात वट पौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसणं शुभ मानलं जातं तसंच कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये हेही सांगण्यात आलंय. ज्योतिषशास्त्रानुसार वैवाहित महिलांनी पूजेच्या वेळी पांढऱ्या, काळ्या आणि निळ्याची साडी चुकूनही नसू नयेत. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)