फिल्ममेकर आणि निर्माता करण जोहर हा भारतीय सिनेसृष्टीतील यशस्वी सेलिब्रिटीपैकी एक आहे. पण याचा अर्थ असा नाही की, त्याने कधी जीवनात अपयश किंवा असुरक्षिततेचा सामना केला नसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार फेय डिसोझा यांनी आयोजित केलेल्या 'ए कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन विथ फेय डिसोझा' च्या एका एपिसोडमध्ये, करण जोहरने त्याच्या बालपणाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. करण जोहर म्हणतो की, त्यांना पाहिजे तसा मुलगा होण्यामध्ये मी अयशस्वी ठरलो. 


पुढे करण जोहर म्हणतो की, मी इतर मुलांपेक्षा वेगळा होतो. माझ्या शाळेतील इतर मुलांसारखा मी अजिबातच नव्हतो. मला खेळ खेळायला आवडत नसतं. मी फक्त पुस्तकात डोकं घालून असायचो. मी असंख्य हिंदी सिनेमे पाहिले आहेत. पण मी खूप एक्स्ट्रोवर्ट होतो पण मला सामाजिक होणे कधीच जमले नाही. 


पुढे करण जोहर सांगतो की, मी खूपच लाजरा, बजरा होतो. पण ही गोष्ट माझ्या पालकांना खास करुन माझ्या आईली खूप दुखावणारी होते, हे मला कधीच कळलं नाही. पण याची सल तिच्या डोळ्यात कायम दिसायची. 


अनेक मुलं करण जोहर सारख्या प्रसंगातून जात असतात. त्यांना स्वतःला आपली ओळख झाली नसल्यामुळे ते आपल्या पालकांना नारिश करतात. अशा मुलांना या समस्येतून सोडवण्यासाठी काय करणे अपेक्षित असते, हे समाजाने आणि पालकांनी देखील समजून घेणे महत्त्वाचे असते. 


मुलं आपलं अस्तित्त्वाशीच झगडा करतात, याची लक्षणे काय? 


  1. मुलांना आपण कोण आहोत? आपलं अस्तित्व काय आहे? हे समजून घेण्यासाठीच बराच कालावधी लागतो. पण या परिस्थितीची वेगळी अशी काही खास लक्षणे नाहीत. 

  2. मुलांच्या त्याच्या स्वतःच्या ओळखीसाठी संघर्ष सुरु असते. अशावेळी मुलांना पालकांच्या नकाराची देखील भीती वाटते. या सगळ्या गोष्टी मुलांचे वय आणि विकासाच्या टप्प्यावर अनेक गोष्टी अवलंबून असते. मुलांमध्ये दिवसेंदिवस वयानुसार बदल होत जातो. 

  3. सजशी मुलं मोठी होतात तसतशी त्यांची या संघर्षांना व्यक्त करण्याची पद्धत बदलते. सुरुवातीच्या शालेय वर्षांतील मूल खेळताना अचानक माघार घेऊ शकतात किंवा जास्त आक्रमक होऊ शकतात. 

  4. जेव्हा मुले त्यांच्या किशोरवयीन वर्षात जातात, तेव्हा ओळख संघर्ष अधिक स्पष्ट होऊ शकतात. किशोरवयीन मुले अनेकदा भिन्न स्वरूप, छंद आणि मित्र यामध्ये मतभेद होतात.