Cheating In Relationship: नातं कोणतंही असो, त्या नात्याचा पायाच जर विश्वास नसेल तर कितीही उंच डोलारे उभारले तरीही ते एक दिवस कोलमडणार हीच वस्तूस्थिती. प्रेमाच्या नात्यापासून अगदी लग्नाच्या नात्यापर्यंत, हा विश्वास सारंकाही एकसंध ठेवण्याचं काम करतो. पण, जेव्हा विश्वासाला तडा जातो, तेव्हा तो एक क्षण सारंकाही उध्वस्त करण्यास काणीभूत ठरू शकतो असं म्हणणं गैर नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा नातेसंबंधांमध्ये पुरुषांकडून महिलांचा विश्वासघात केला जात असल्याचं पाहायला मिळतं. पण, ते असं का करतात? यामागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केला आहे का? समाजातही अशी धारणाच आहे की कायमच पुरुष मंडळी एखाद्या नात्याला तडा जाण्यामागं कारणीभूत ठरतात. यामागची कारणं तितकीच वेगळी आणि अनपेक्षित. 


मानसोपचारतज्ज्ञांच्या मते फक्त आणि फक्त आकर्षण (दुसऱ्या व्यक्तीविषयी) नात्याला तडा जाण्यामागचं मुख्य कारण नसतं. तर यामागं आणखीही काही अशी कारणं आहेत, जी तुम्हाला हैराण करतील. काय आहेत ती कारण? पाहा... 
 
स्वाभिमान


काही पुरुषांसाठी विश्वासघात करण्याचं कृत्य हे थेट स्वाभिमानाशी संबंधित असतं. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ला यशस्वी, आकर्षक आणि पात्र समजत नाही तेव्हा ते कोणा दुसऱ्या व्यक्तीशी नातं जोडत पुरुषार्थ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी स्वाभिमानाचा अभाव असणं हे एक मुख्य कारण ठरू शकतं. 


नात्यात जवळीक नसणं 


अनेकदा जोडीदाराप्रती आकर्षण न वाटणं, उत्साह नसण, जवळीक कमी होणं या आणि अशा कारणांमुळं एका नव्या नात्याप्रती पुरुष पाऊल उचलतात. 


हेसुद्धा वाचा : काही ठीक नाहीये...' धमकी सत्रामुळं सलमान बेचैन, मानसिक आरोग्यावर 'असा' होतोय परिणाम


भावनिक आधार 


काही पुरुष वैवाहिक किंवा प्रेमाच्या नात्यांमध्ये भावनिक आधार शोधत असतात. पण, त्यांना असा आधार मिळताना दिसत नाही आणि अशा प्रसंही दुसऱ्याच व्यक्तीशी आपलं नातं जोडत त्या व्यक्तीकडून मिळणारा भावनिक आधार पुरुषांना हवाहवासा वाटतो आणि इथं आधीपासून असणाऱ्या नात्याला तडा जातो. 


एक क्षण... 


बऱ्याचदा नात्यात आपल्या जोडीदाराचा विश्वासघात करणं हे कृत्य ठरवून केलं जात नाही. पण, एक असा क्षण मात्र या कृत्याला चालना देतो हेसुद्धा खरं. इथं त्यांना विश्वासघाताच्या कृत्याची जाणीव नसते, ते फक्त संधीचा फायदा घेतात. 


सेक्शुअल डायवर्सिटी


अनेकदा सेक्शुअल डायवर्सिटी हे कारणंही नात्यात विश्वासघाताची वेळ आणतात. परस्त्रीविषयी वाटणारं आकर्षण हे यामागचं मुख्य कारण असतं. जिथं मुळात अस्तित्वात असणाऱ्या नात्याला फारसं महत्त्वं  न देता बाहेर परस्त्रीशी संबंध ठेवले जातात. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांशी निगडीत असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)