Advantages of using wooden comb : जर तुम्हाला वाटत असेल की फक्त चांगलं तेल किंवा शॅम्पू लावल्याने केसांचं आरोग्य चांगलं राहत तर हे चुकीचे आहे. केसांना मजबूत बनवण्यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळा कंगव्याने केस विचरणं महत्वाचं आहे. अधिकतर लोक प्लास्टिकच्या कंगव्याने केस विंचरतात तर काही लोक लाकडी कंगव्याचा वापर करतात. तेव्हा जाणून घेऊयात या दोन दोघांपैकी कोणता कंगवा जास्त चांगला ठरेल. 


प्लास्टिकचा कंगवा वापरण्याचे दुष्परिणाम : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लास्टिकचा कंगवा हा केसांसोबतच पर्यावरणाला सुद्धा नुकसान पोहोचवतो. प्लास्टिकच्या कंगव्याने कस विचारल्याने हेअर फॉलची समस्या होऊ शकते. एकूणच प्लास्टिकचा कंगवा तुमच्या केसांना डॅमेज करतो. 



लाकडी कंगवा का वापरावा? 



पूर्वीच्या काळापासून लाकडी कंगव्यांचा वापर केला जायचा मात्र कालांतराने त्याची जागा ही प्लास्टिक कंगव्यांनी घेतली. लाडकी कंगव्याचा वापर केल्याने केसांचं आरोग्य चांगलं राहतं. लाकडी कंगवा वापरल्याने केस कमी तुटतात. लाडकी कंगव्यामुळे स्कॅल्पमधील ब्लड सर्कुलेशन देखील सुधारते. 


हेही वाचा : Fridge च्या आत हे बटण 10 वर्षांपेक्षा जास्त टिकवणार तुमचं फ्रीज, अगदी नव्यासारखाच चालेल


 


चांगल्या क्वालिटीचा लाकडी कंगवा वापरा : 


जर तुमचे केस फ्रिजी झाले असतील तर प्लास्टिकच्या कंगव्या ऐवजी लाकडाच्या कंगव्याचा वापर करा. लाकडाचा कंगवा तुमच्या केसांचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. मात्र केसांसाठी चांगल्या क्वालिटीच्या लाडकी कंगव्यांचा वापर करा. अन्यथा केसांचं आरोग्य बिघडू शकत आणि केस तुटतात.