LIVE Gujarat Election Result 2022 : मोठ्या यशानंतर या तारखेला सरकारचा शपथविधी, मोदींची खास उपस्थिती
Gujarat Election Result 2022 LIVE: गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला आहे.
Gujarat Election Result 2022 LIVE Vote Counting : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला होती. मात्र भाजपने आघाडी घेतली आहे. तर विरोधी पक्ष म्हणून गेल्या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे या निवडणुकीत किती जागा मिळवणार याची उत्सुकता आहे.
Latest Updates
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) जामनगर उत्तर मतदारसंघातून विजयी झाल्यात. रिवाबा भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी आहे.
Gujarat Election Result : 12 डिसेंबरला दुपारी 2 वाजता गुजरातमधील नव्या सरकारचा शपतविधी सोहळा होईल. मुख्यमंत्री शपथसोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सहभागी होतील, अशी माहिती भुपेंद्र पटेल यांनी दिली. जनतेच्या आर्शीवादाने पुन्हा भाजपच सरकार स्थापन करणार आहे. गुजराथच्या जनतेचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार. त्यांनी मेहनत घेतली. या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान आहेत, असे भुपेंद्र पटेल यांनी यावेळी सांगितले. गुजरातच्या विकास यात्रेत अडथळा आणणाऱ्या शक्तींना नाकारून गुजरातच्या जनतेने भाजपला सत्ता दिली, असे प्रतिपादन भुपेंद्र पटेल यांनी केले.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) 5 जागांवर विजय मिळवत 150 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने (Congress) 1 एका जागेवर विजय मिळवत 18 जागांवर आघाडी घेतली आहे तर AAP ने 5 तर इतर 3 जणांनी आघाडी घेतली आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत घाटलोडिया मतदारसंघातून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendrabhai Patel) विजयी झाले आहेत.11 डिसेंबरला सरकारचा शपथविधी सोहळा ?
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, नवीन सरकारचा शपथविधी 11 डिसेंबरला होऊ शकतो आणि पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, अशी बातमी सूत्रांकडून हाती आली आहे.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळताना दिसत आहेत. निकाल अजून लागला नसला तरी हाती आलेल्या कलवरुन भाजप एकनंबरचा पक्ष ठरलाय. गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजपच्या गांधी नगरमध्ये भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.कार्यकर्ते कार्यालयाबाहेर गरबा खेळताना दिसत आहेत.
गुजरातमध्ये पुन्हा चित्र पालटलं, भाजप 150 पार
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत दिसत आहे. भाजप 154 जागांवर तर काँग्रेस 18 ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर आप 6 जागांवर पुढे आहे. तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
गुजरातमधील 5 जागांचे निकाल जाहीर
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत 5 जागांचे निकाल आले असून, त्यापैकी भाजपने 4 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे.
इसुदान गढवी खंभलिया मतदारसंघातून आघाडीवर
Gujarat Election Result : द्वारका जिल्ह्यातील खंभलिया विधानसभा मतदारसंघातून 'आप'चे मुख्यमंत्री उमेदवार इसुदान गढवी (Isudan Gadhvi) 18998 मतांनी आघाडीवर आहेत.
गुजरात कल भाजपकडे, गांधीनगर भाजप कार्यालयात जल्लोष
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीतील शानदार कामगिरीनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गांधीनगरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार भाजप 182 जागांपैकी 152 जागांवर आघाडीवर आहे.
गुजरातमध्ये भाजप - 147 , काँग्रेस - 20 तर आप - 9
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे. भाजपच्या आकड्यात घट झालेय. 150 वरुन आता 147 आकडा झालाय. तर आपच्या जागेत वाढ होताना दिसत आहे. आप - 9 तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. तर अन्य 4 जागांवर आघाडीवर आहेत.हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर आघाडीवर
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत विरमगाम मतदारसंघातून भाजप उमेदवार हार्दिक पटेल 3099 मतांनी आघाडीवर आहे. गांधीनगर दक्षिण मतदारसंघात पाच फेऱ्यांनंतर भाजपचे अल्पेश ठाकोर 4130 मतांनी आघाडीवर आहेत.
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप 150 जागांवर तर काँग्रेस 18 ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर आप 6 जागांवर पुढे आहे. तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2022 LIVE । Gujarat Election Result 2022
क्रिकेटर जडेजाची पत्नी रिवाबा 8671 मतांनी आघाडीवर
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तर मतदारसंघातून दुसऱ्या फेरीनंतर भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) या 8671 मतांनी आघाडीवर आहेत.
सुरत, राजकोट आणि गांधीनगरमध्ये भाजप पुढे
Gujarat Election Result : गुजरातमधील सुरतमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) 16 पैकी 14 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय राजकोटच्या सर्व 8 जागांवर भाजपने आघाडी घेतली असून गांधीनगरच्या सर्व 5 जागांवर भाजप आघाडीवर आहे.
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप 145 जागांवर तर काँग्रेस 24 ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर आप 9 जागांवर पुढे आहे. तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
Gujarat Election Result : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 13 हजार मतांनी आघाडीवर
गुजरात विधानसभा निवडणूक निकाल हाती येऊ लागले असून भारतीय जनता पक्षाला (BJP) बहुमत मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendrabhai Patel) दुसऱ्या फेरीअखेर 13000 मतांनी आघाडीवर आहेत.Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) जामनगर उत्तर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. रिवाबा भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी आहे.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी (Isudan Garhvi) खंभलिया विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपचे विरगाम मतदारसंघातून हार्दिक पटेल (Hardik Patel) दुसऱ्याला फेरीमध्ये 300 मतांनी आघाडीवर
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजप 122 जागांवर आघाडीवर
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) 122 जागांवर आघाडीवर आहे. त्याच वेळी, काँग्रेस पक्ष (Congress) 56 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी (AAP) 3 आणि इतर 1 जागांवर आघाडीवर आहे.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पार्टीचे (BJP) उमेदवार हार्दिक पटेल विरमगाममधून आता आघाडीवर
Gujarat Election Result : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मतदारसंघातून आघाडीवर आहे. त्या भाजपकडून रिंगणात आहेत.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागांसाठी सुरुवातीचे ट्रेंड हाती आले आहेत आणि भारतीय जनता पक्षाला (BJP) ट्रेंडमध्ये खूप फायदा झाला आहे. भाजप 127 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस पक्ष (Congress) 50 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी (AAP) 3 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.
Gujarat Election Result 2022 LIVE : आम्ही निश्चितपणे सरकार स्थापन करणार आहोत. यात काही शंका नाही. विरमगाममधील भाजप उमेदवार हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. पक्षाला 135 - 145 जागा मिळतील असा त्यांनी दावा केलाय.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) दुसऱ्या क्रमांकावर असून वडगाम मतदारसंघातून काँग्रेसचे दलित नेते जिग्नेश मेवानी आघाडीवर आहेत. येथे भाजपचा (BJP) उमेदवार पिछाडीवर आहे.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) बाजी मारली असली तरी प्रतिष्ठेच्या लढतीत विरमाग मतदार संघात हार्दिक पटेल पिछाडीवर आहे तर आपचा उमेदवार आघाडीवर आहे.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) बाजी मारली असून पक्ष 123 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस पक्ष (Congress) 42 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी (AAP) 3 आणि इतर 1 जागेवर आघाडीवर आहे.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठी आघाडी घेतली आहे आणि पक्षाने 101 जागांवर आहे. त्याचबरोबर काँग्रेस (Congress) 30 आणि आम आदमी पार्टीने (AAP) 3 जागांवर आघाडी घेतली आहे.
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) पुढे गेला असून पक्षाने 53 जागांवर आघाडी घेतली आहेत. त्याचबरोबर काँग्रेसने 13 आणि आम आदमी पार्टीने (AAP) 2 जागांवर आघाडी घेतली आहे.
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप 20 जागांवर तर काँग्रेस 7 ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर आप 2 जागांवर पुढे आहे.
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपने खातं उघडलं. भाजपने 4 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने दोन ठिकाणी आघाडी घेतली.
Gujarat Election Result : गुजरातच्या 182 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यांत निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही प्रतिष्ठापणाला लागली आहे.
Gujarat Election Result 2022 : गुजरात, हिमाचल निवडणुकीचा आज निकाल आहे. गुजरात, हिमाचलचा गड भाजप राखणार का?, काँग्रेसची काँटे की टक्कर की सुपडा साफ? तर आप बिघडवणार का भाजपच्या सत्तेचं गणित? 'झी 24 तास'वर पाहा निवडणुकीचं अचूक अपडेट दिवसभर
Gujarat Election Result 2022 : गुजरातचा कौल कुणाला? जाणून घ्या निवडणुकीचे निकाल कुठे पाहायचे
Gujarat Election Result : गुजरातच्या 182 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यांत निवडणूक झाली. एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्वांनीच भाजपला बहुमत मिळेल,असा अंदाज वर्तवला आहे. मात्र आज प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल, तेव्हा तोच कौल राहणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Gujarat Election Result : गुजरात, हिमाचल निवडणुकीचा आज निकाल
- गुजरात, हिमाचलचा गड भाजप राखणार?
- काँग्रेसची काँटे की टक्कर की सुपडा साफ?
- आप बिघडवणार का भाजपच्या सत्तेचं गणित?
- झी 24 तासवर पाहा निवडणुकीचं अचूक अपडेट दिवसभरGujarat Election Result : गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांचे आज निकाल. भाजप सत्ता राखणार की सत्तांतर होणार याकडे देशाचं लक्ष लागले आहे. निवडणुकांच्या क्षणाक्षणाचे अजूक अपडेट पाहा दिवसभर फक्त झी 24 तासवर.....