Gujarat Election Result 2022 : गुजरात विधानसभेच्या निकालाकडे (Gujrat Assembly Election Result 2022) संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2 टप्प्यात मतदान पार पडलं. त्यानंतर आता गुरुवारी 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. एक्झिट पोलनुसार (Exit Poll) भाजपला (Bjp) स्पष्ट बहुमत आहे. मात्र खरे आकडे हे मतमोजणीनंतरच (Vote Counting) समोर येतील. गुजरातमधील 33 जिल्ह्यांमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला 2 टप्प्यात मतदान झालं. गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर सकाळी 10 पर्यंत जवळपास चित्र स्पष्ट होईल. एकूण 37 केंद्रांवर मतमोजणी पार पडणार आहे. (gujrat assembly election result counting 2022 know when to see constituencywise all candidates result winner list)
विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि प्रत्येक लाईव्ह अपडेट तुम्हाला झी 24 तासच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. त्याशिवाय निवडणूक आयोदाच्या वेबसाईटवरुनही माहिती घेऊ शकता. एकूण 93 मतदारसंघांसाठी सोमवारी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान मोठ्या सुरक्षेत पार पडलं. दुसऱ्या टप्प्यात एकूण 61 पक्षांचे 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दुसऱ्या टप्प्यात एकूण 59.11 टक्के मतदान झालं.
तर 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 63.31 वोटिंग झालं. पहिल्या टप्प्यात विविध पक्षाचे एकूण 788 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
गुजरातमध्ये एक्झिट पोलनुसार भाजप पुन्हा एकदा सत्तेत येतंय. एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवलाय. विविध एक्झिट पोलनुसार भाजप यंदा 100 चा आकडा पार करतेय. भाजपचे 110-125 उमेदवार जिंकून येतील. तर काँग्रेसचे 45-60 आमदार निवडून येतील. तर आपचाही 1-5 जागांवर विजय होईल.
भाजप - 99
काँग्रेस -77
अपक्ष - 3
भारतीय ट्रायबल पार्टी - 2
राष्ट्रवादी काँग्रेस - 1
दरम्यान या निवडणुकीत भाजपचं कमळ पुन्हा फुलणार की आणखी काही होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.