LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | काँग्रेस 38, भाजपला 27 जागा

Thu, 08 Dec 2022-1:25 pm,

LIVE | Himachal Pradesh Election Result 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा, काँग्रेस 38 तर भाजप 27 जागांवर आघाडीवर

Himachal Pradesh Assembly Election Result Live Updates: हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसने बहुमताचा आकडा केला पार


 

Latest Updates

  • Himachal Election Result Update: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Assembly Election Result 2022) काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा पार केला आहे. सुरुवातीच्या निकालानुसार काँग्रेसने 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला (BJP) 27 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. याशिवाय 3 अपक्ष उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. यादरम्यान काँग्रेसने मोठी रणनिती आखली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस उमेदवार फुटण्याची भीती काँग्रेसला वाटत असून विजयी उमेदवारांना राजस्थानमध्ये हलवण्यात येणार आहेत. 

    काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या राजस्थानमधल्या सवाई माधोपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांच्याबरोबर प्रियंका गांधी यासुद्धा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका गांधी रणथंभोरमधल्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी राजस्थानमध्ये हिमाचल प्रदेशमधल्या काँग्रेसच्या विजयी उमेदवारांशी चर्चा करतील.

  • हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - काँग्रेसची मोठी खेळी, विजयी उमेदवारांना राजस्थानला हलवणार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमध्ये दाखल

  • हिमाचल प्रदेश विधानसभा - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी हिमाचलमध्ये दाखल, विजयी उमेदवारांना राजस्थानमध्ये नेणार

  • हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केला बहुमताचा आकडा पार, काँग्रेसला 39 जागांवर आघाडी तर भाजप 26 जागांवर पुढे

  • हिमाचल प्रदेश विधानसभा - काँग्रेसची जोरदार मुसंडी बहुमताचा आकडा पार 38 जागांवर आघाडी, तर भाजपला 27 जागा

    आपला खातंही उघडता आलं नाही, 3 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

  • हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - जोगिंदरनगर मतदारसंघातून भाजपचे प्रकाश प्रेम कुमार आघाडीवर, काँग्रेसचे उमेदवार ठाकूर सुरेंद्र पाल यांच्यापेक्षा 6095 मतांनी पुढे, जयसिंहपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार यदविंदर गोमा भाजप उमेदवारापेक्षा 1391 मतांनी पुढे

  • हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - अनुसार बंजारमधून अपक्ष उमेदवार हितेश्वर सिंह तर नालागढमधून अपक्ष उमेदवार केएल ठाकूर आघाडीवर, भाजप आणि काँग्रेसमधली चूरस पहाता अपक्ष उमेदवार किंग मेकर ठरणार

  • हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक - भाजप पुन्हा आघाडीवर 33 जागांवर पुढे, तर काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर

  • हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, भाजचे प्रभारी विनोद तावडे आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यात तातडीची बैठक

  • हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - अनुसार बंजार मतदारसंघातून काँग्रेसचे खिमी राम आघाडीवर, निवडणुकीच्या काही दिवस आधीच खिमी राम काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. लाहोल स्पिती मतदारसंघात भाजपचे राम लाल मार्कंडेय पुढे

     

  • हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - भाजप पुन्हा आघाडीवर 34 जागांवर पुढे, तर काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर, अपक्ष 3 जागांवर आघाडी

  • हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - 9.30 वाजेपर्यंत काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 30 जागांवर आघाडी, आपला अद्याप खातंही उघडता आलं नाही, तर अपक्ष 1 जागेवर पुढे

  • हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - काँग्रेस पुन्हा आघाडीवर 35 जागा, तर भाजप 31 जागांवर आघाडी

  • हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूक - रामपूर मतदारसंघात काँग्रेसचे नंदलाल तर बल्ह मतदार संघात काँग्रेसचे प्रकाश चौधरी आघाडीवर, अनुसार सुलह मतदारसंघातून विपिन परमार आघाडीवर, विपिन परमार विधानसभा स्पीकर होते

  • हिमाचलप्रदेश विधानसभा - चम्बा आणि डलहौसी मतदार संघात भाजपचे उमेदवार आघाडीवर, तर भट्टीयात आणि फतेपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर

  • हिमाचल प्रदेश विधानसभा - भाजप 36 जागांसह पुन्हा आघाडीवर, तर काँग्रेस 32 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर

    हिमाचलमध्ये आपला अद्याप खातं उघडता आलेलं नाही

  • हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक -  काँग्रेस 33 जागांवर आघाडी तर भाजप 27 जागांवर आघाडी

    हिमाचलमध्ये आपला अद्याप खातंही उघडता आलेलं नाही

  • हिमाचल प्रदेश विधानसभा - भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस

    भाजप 18 तर काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर

  • हिमाचल विधानसभा निवडणक - काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर, भाजप 8 जागांवर आघाडी

  • हिमाचल प्रदेश विधानसभा - भाजप 4 जागांवर तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर

  • Himachal Pradesh Election Result 2022 Live : हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पक्नी आणि हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्या प्रतिभा सिंह यांनी काही सूचक वक्तव्य केली. तर तिथे मंडीमध्ये मतमोजणीच्या आधीची दृश्य लक्ष वेधणारी ठरली. 

  • Himachal Pradesh Election Result 2022 Live : हिमाचल सरकारमध्ये एक प्रथा वर्षानुवर्षांपासून पाहायला मिळत आहे, की इथं दर पाच वर्षांनी सरकार बदलत आहे. यावेळी भाजपचं हेच लक्ष्य राहणार असून या राज्यात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एककेंद्री असेल. 

  •  

    Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live : हिमाचल प्रदेशातील निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर बुधवारी शिमला येथील रिज भागामध्ये गोलगप्पे खाताना दिसले. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा झाली.

  • Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होताच सर्वप्रथनम पोस्टल बॅलेटमधील मतमोजणी केली जाणार आहे. ज्यानंतर ईव्हीएम मशिनच्या मतांची मोजणी सुरु होईल. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link