Maharashtra Political News | Live Marathi News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 14 Jan 2023-12:01 am,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचं समन्स

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ED Summons to Commissioner Iqbal Singh Chahal : कोरोना काळातील वैद्यकीय उपकरण घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) हे ईडीच्या रडारवर आले आहेत. चहल यांना ईडीनं समन्स बजावलाय. सोमवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं चहल यांना दिले आहेत. त्यामुळे चहल यांच्या मागे आता ईडीच्या चौकशीचा ससेमीरा सुरू झालाय. ईडीनं कोरोना काळातील घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावल्याची SUPER EXCLUSIVE बातमी 'झी २४ तास'नं गुरूवारीच दिली होती. त्याच बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय. 

    बातमी पाहा - https://bit.ly/3ZAeJod

  • शिवसेना कुणाची 17 जानेवारीला ठरणार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shivsena Party Symbol | Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सर्वात मोठी घडामोड. शिवसेनेचं (Shivsena) भवितव्य 17 जानेवारीला ठरणार आहे. शिवसेना कुणाची याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग 17 जानेवारीला देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'झी २४ तास'ला दिलीय. एवढंच नव्हे तर निवडणूक आयोग शिंदे गटाला (Eknath Shinde Group) कौल देण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. 

    बातमी पाहा - https://bit.ly/3iz7PPF

  • हिंगोलीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Farmer's Agitation | Marathi News LIVE Today : हिंगोलीच्या(Hingoli) सेनगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Farmers Association)कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलं. आयसीआयसीआय लोम्बार्डच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांनी खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्याची तोडफोड केली. पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही. याबाबत अर्जविनंत्या करूनही विम्याची रक्कम पदरात न पडल्यानं शेतकरी आक्रमक झाले.

    बातमी पाहा - https://bit.ly/3w4c1tP

     

  • MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MPSC Students Protest : MPSCची तयारी करणारे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत. परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केलाय. त्याविरोधात विद्यार्थी राज्यभर आंदोलन करतायत. सकाळी दहा वाजल्यापासून राज्यभरात आंदोलन पुकारलंय. पुण्यात(Pune) MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं. अलका चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच. आंदोलनाला सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी(Atul Londhe) केलाय. उपराजधानी नागपुरातही (Nagpur) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर NSUI आणि MPSC विद्यार्थी आंदोलन करतायत. नागपुरात  काँग्रेस आमदार अभिजीत वंजारींच्या(Abhijeet Vanjari) नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येतंय. 

    संभाजीनगरमध्ये (SambhajiNagar) महात्मा फुले चौकात MPSCचे विद्यार्थी मोठ्या संख्येने जमलेत. काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत. तर कोल्हापुरातल्या(Kolhapur) सायबर चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करा अशी विद्यार्थ्यांची मागणी केलीय. दरम्यान याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी सांगितलं. MPSC विद्यार्थी आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, अजित पवारांनीही (Ajit Pawar)घेतली आंदोलनाची दखल. अजित पवार उद्या शिंदें-फडणवीसांना भेटणार.

    बातमी पाहा - https://bit.ly/3iBMPaU

  • खोके सरकारकडून बीएमसीची लूट -आदित्य ठाकरे

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aditya Thackeray Live | Maharashtra Political News : शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेच्या रस्त्यांच्या कंत्राटावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर जोरदार टीका केलीय. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात मोगलाई सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. बीएमसी रस्ते कंत्राटावरून त्यांनी बीएमसीच्या अधिका-याला ईडीची नोटीस आली असेल तर होऊ द्या चौकशी असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला दिलंय. खोके सरकारकडून बीएमसीची लूट, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात.

    बातमी पाहा - https://bit.ly/3GCgJUA

     

  • आचारसंहिता भंग प्रकरणी आमदार रवी राणांना दणका

    Ravi Rana : आचारसंहिता भंग प्रकरणी आमदार रवी राणांना (Ravi Rana) जिल्हा प्रशासनाने दणका दिलाय. कृषी महोत्सव बंद करण्याचे आदेश दिले असून, संध्याकाळपर्यंत मैदान रिकामं करण्यास सांगितलंय. राणांच्या युवा स्वाभिमानकडून 12 जानेवारी ते 16 जानेवारीदरम्यान अमरावतीत कृषी महोत्सव आयोजन करण्यात आले होतं.. गेटवर पंतप्रधान मोदी, शहा, यांचे फोटो असल्याने जिल्हा प्रशासनाने कारवाई करीत महोत्सव बंद करण्याचे आदेश दिलेयत. जिल्ह्यात आचारसंहिता लागली असल्याने ही कारवाई करण्यात आलीय.ही कारवाई करण्यास मविआनं दबाव आणल्याचा आरोप रवी राणांनी केलाय. 

  • कोरोना काळ उद्धव सरकारच्या कमाईचं साधन- किरीट सोमय्या

    Kirit Somaiya on Corona : कोरोना काळ म्हणजे उद्धव ठाकरे सरकारच्या कमाईचं साधन होतं असा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केलाय.. कोरोना काळात केलेल्या काळ्या कमाईचा सर्वांनाच हिशोब द्यावा लागणार... किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) असो किंवा संजय राऊत (sanjay raut) नाहीतर इक्बाल चहल असोत... काळ्या कमाईचा हिशोब घेणारच असा इशारा किरीट सोमय्यांनी दिलाय. 

  • वेणूगोपाल धूतांची अटक बेकायदेशीर, वकिलांचा दावा 

    ICICI Bank-Videocon Loan Case : आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)घोटाळा प्रकरणी वेणूगोपाल धूत यांच्या (Venugopal Dhoot) बेकायदेशीर अटक याचिकेवर युक्तीवाद पूर्ण झालाय. मुंबई हायकोर्टाने निकाल राखून ठेवलाय. व्हिडिओकॉन (Videocon) समूहाचे व्यवस्थापक वेणूगोपाल धूत यांची अटक बेकायदेशीर असल्याचा त्यांच्या वकिलांचा दावा आहे...तर धूत यांनी तपासात सहकार्य केलं नसल्याने त्यांना अटक केल्याचा दावा सीबीआयच्या वकिलांचा युक्तीवादादरम्यान केला. याप्रकरणी काही वेळात निकाल येण्याची शक्यताय. त्यानंतरच धूत यांना जामीन मिळणार की पुन्हा जेल होणार हे कळेल.

  • एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ST Employees Salaryएसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर. एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार (Salary) होणार. पगारासाठी राज्य सरकारकडून 300 कोटी वितरित. एसटी कर्मचाऱ्यांची (ST Employees)संक्रात गोड होणार.

    बातमी पाहा- एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी बातमी, सरकारकडून 300 कोटी वितरित

  • मुंबई उच्च न्यायालयाचा रॅपिडो कंपनीला मोठा दणका 

    Rapido Closed : रॅपिडो कंपनीला मोठा दणका. पुण्यातली रॅपिडो (Rapido Bike) बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करा. मुंबई हायकोर्टाचे आदेश, रॅपिडो कंपनीची रिक्षा, डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना असल्याचं स्पष्ट. सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश. जानेवारीपर्यंत राज्यभरातील सर्व सेवा बंद करण्यास कंपीनीची तयारी, पुढील शुक्रवारी पुन्हा सुनावणी.

  • भारतातील 1 हजार कर्मचाऱ्यांसह 18 हजार कर्मचाऱ्यांना अ‍ॅमेझॉन नारळ देणार

    Amazon Cost Cutting : भारतातल्या 1 हजार कर्मचा-यांसह 18 हजार  कर्मचाऱ्यांना अ‍ॅमेझॉन (Amazon)डच्चू देणार आहे. कपात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी 5 महिन्यांचा पगार देणार आहे. तांत्रिक विभाग, HR तसंच अन्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने नारळ दिलाय. गुरुग्राम, बंगळुरु तसंच विविध शहरांतल्या कार्यालयातून कपातीला (Cost Cutting) सुरुवात करण्यात आली आहे. ज्या विभागांमध्ये कंपनीला तोटा होतोय, त्यांना सर्वात जास्त फटका बसलाय. कपात केलेल्या कर्मचा-यांमध्ये अनुभवी तसंच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कर्मचारी कपातीची प्रक्रिया पुढच्या आठवड्यापर्यंत सुरु राहणार आहे.

  • Nana Patole Live | Maharashtra Political News : 'तांबेंनी पक्षासोबत फसवेगिरी केली', 'सर्व रिपोर्टस हायकमांडला पाठवले', 'दुसऱ्यांची घरं फोडून  आनंद साजरा करतात', 'भाजपचं घरं फुटेल तेव्हा समजेल', नाना पटोले यांचा भाजपला इशारा 

    बातमी पाहा- Nana Patole संतापले! सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही; पटोले यांनी ठणकावलं

  • Nana Patole Live | Maharashtra Political News : 'काँग्रेसनं सुधीर तांबेंना उमेदवारी दिली होती', 'सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही', 'सत्यजित तांबेंनी काँग्रेसला धोका दिला', 'हायकमांड पुढील निर्णय घेणार', नाना पटोले यांचा सत्यजित तांबे यांना टोला.

  • संदीप देशपांडेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

    Sandip Deshpande on Uddhav Thackeray :  'घरात बसलेल्यांनी कोरोनात बरोबर घोटाळा केला' मनसेच्या संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर टोला लगावलाय.तर 'मनपा प्रमुख म्हणून इक्बाल सिंह चहल जबाबदार', कोरोना भ्रष्टाचारावरुन मनसेचा आयुक्तांवर आरोप केलाय.

  • पोलीस भरतीमध्ये अगोदर मैदानी चाचणी होणार

    Mumbai Police Recruitment : पोलीस दलात भरती होणा-यांची यंदा लेखी परीक्षेआधी मैदानी चाचणी होतेय. त्यामुळे सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांपुढे आहे. मुंबई पोलीस (Police) दलात शिपाई आणि चालकांच्या 8 हजार पदांसाठी भरती होतेय. त्यासाठी तब्बल 7 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केलाय. मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पोलीस दलात भरती सुरुय. मुंबईसोडून इतर ठिकाणी ही प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. मुंबईत 31 जानेवारीपासून 5 मैदानांमध्ये प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू केली जाणारेय. 

  • पुण्यात 13 अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल होणार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Bogus Schools : बातमी झी २४ तासच्या बोगस शाळांविरोधातल्या (Bogus Schools) मोहिमेची. पुण्यात अनधिकृतपणे सुरु असलेल्या 13 इंग्रजी शाळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेत. या शाळांची तपासणीही केली जाणार आहे. राज्य सरकारची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा (English Schools)सुरु असल्याचा प्रकार समोर आला होता. पुढच्या 2 दिवसांत याप्रकरणात गुन्हे दाखल केले जातील. पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील शाळांचा यात समावेश आहे.

    बातमी पाहा- zee 24 taas चा दणका! 13 बोगस इंग्रजी शाळांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

  • नाशिकमध्ये बस आणि ट्रकची भीषण धडक, 10 जणांचा मृत्यू

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Accident : सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ खासगी बस आणि ट्रकची भीषण धडक झाली आहे. अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झाल्याची माहिती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते.

    बातमी पाहा-  साईभक्तांच्या बसला भीषण अपघात, 10 जण ठार तर 12 गंभीर

  • म्हाडाचा मनमानी कारभार आणि उधळपट्टीवर निर्बंध

    Devendra Fadnavis on Mhada : म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि उधळपट्टीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)लगाम घातलाय. 50 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या कोणत्याही कामांसाठी आता सरकारची पूर्वमान्यता घेणं आवश्यक करण्यात आलंय. प्रकल्पाच्या मूळ किंमतीमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होणार असेल तर त्यासाठीही सरकारची मान्यता घेण्याचे आदेश म्हाडाला देण्यात आलेत. गतिमान कारभारासाठी म्हाडाच्या  (Mhada)अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे अनेक अधिकार देण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांकडून त्याचा गैरवापर होताना दिसतोय. म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घातलाय. 

  • त्र्यंबकेश्वराचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं

    Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांसाठी आजपासून खुलं झालंय. (Trimbakeshwar) ज्योतिर्लिंगाचं संवर्धन आणि मंदिराच्या देखभालीसाठी 5 ते 12 जानेवारीपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ठरलेल्या वेळेत संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. 8 दिवसांत भारतीय पुरातत्त्व खात्याकडून शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला. यादरम्यान त्रिकाल पूजा, प्रदोष पुष्पपूजा असे नित्यपाठ सुरू होते मात्र भाविकांना दर्शनासाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. मात्र आज संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यात येतंय. 

  • मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार 

    Maharashtra Cold  : मुंबईसह राज्यभरात थंडीचा (Cold)कडाका वाढणार आहे. हवामान खात्यानं अशी शक्यता वर्तवलीय. उत्तरेकडील शीत लहरींमुळे राज्यात हुडहुडी भरलीय. मुंबईत तापमानाचा पारा 16 अंशांवर घसरलाय. मुंबईसह राज्यभर पुढील 4 चार दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. 

  • एसटीचे 90 हजार कर्मचारी वेतनविना 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ST Employees : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार (Salary) झालेला नाही. त्यामुळे ते आक्रमक झालेत. संपादरम्यान पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचं, तसंच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं. मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार एसटी कर्मचारी (ST Employees) नाराज आहेत. यासंदर्भात एसटी संघटनेनं महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावलीय. सरकारकडून अपुरा आणि वेळेवर मिळत नसलेल्या निधीमुळे कर्मचा-यांचं वेतन लांबणीवर पडू लागलंय.

    बातमी पाहा-  एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत, संघटनेने उचलले हे मोठे पाऊल

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link