Maharashtra News Live Updates : एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

Thu, 10 Nov 2022-11:04 pm,

Maharashtra News Updates: Live Marathi News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, बातम्यांचे वेगवान Live अपडेट्स

Latest Updates

  • Recruitment of teachers in State: पवित्र पोर्टलमार्फत(Pavitra Portal) होणार राज्यात शिक्षक भरती, शिक्षण विभागाने काढला जीआर. TAIT परीक्षार्थींना वयात 2 वर्षांची सवलत. राज्यातील(Maharashtra) सर्व शिक्षण संस्थांना नियम लागू, अनुदानित, विना अनुदानित, रात्र शाळा, शासकीय आणि अनुदानित अध्यापक विद्यालयातील(डी. एल.एड. कॉलेज)ला नियम लागू.

    बातमीची लिंक - https://bit.ly/3hlHCTw

  • Rahul Gandhi(Maharashtra Political News Live):  'भारत जोडो' यात्रेचा महाराष्ट्रात चौथा दिवस,  नांदेडमधील जाहीर सभेत राहुल गांधींचा(Rahul Gandhi) सत्कार.यात्रेत राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी, सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि जयंत पाटलांची(Jayant Patil) उपस्थिती, 'तपस्येमुळे महापुरूषांमधील अहंकार संपला', मात्र शेतकऱ्याला तपस्येचं फळ मिळालं नाही-राहुल गांधी. नोटबंदी आणि चुकीचा जीएसटी लागू केलाय. महाराष्ट्रातून उद्योग गायब होत आहेत- राहुल गांधी(Maharashtra Political News Live).

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीची लिंक - https://bit.ly/3UsCITB

     

  • Sudhir Mungantiwar(Maharashtra Political News Live):  छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणणार. 2024 पूर्वी तलवार परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांचं मोठं विधान. लंडनमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार(Maharashtra Political News Live).

    बातमीची लिंक - https://bit.ly/3Um0LU2

  • Sanjay Raut (Maharashtra Political News Live): संजय राऊतांच्या(Sanjay Raut) जामिनावरील स्थगितीवर उद्या सुनावणी. ईडीच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी. राऊतांच्या जामिनावर हायकोर्टाची टांगती तलवार, राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध(Maharashtra Political News Live).  

    बातमीची लिंक - https://bit.ly/3Uok4Ml

  • Jacqueline Fernandez Arrest at any moment?: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez)कोणत्याही क्षणी अटक होणार? जॅकलिनवर अटकेची टांगती तलवार, 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनचं नाव. महाठग सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrasekhar)सोबतची जवळीक भोवली, ईडीकडून त्रास होत असल्याचा जॅकलिनचा आरोप.

    बातमीची लिंक - https://bit.ly/3EgX9wZ

  • ICC T-20 World Cup India vs England Match : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T-20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडकडून दारूण पराभव, 10 विकेट्स राखून इंग्लंड(England) विजयी, जोस बटलर आणि अ‍ॅलेक्सची धुवाँधार बॅटिंग. भारताचं फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीची लिंक - https://bit.ly/3G3H6Uw

     

     

  • Sanjay Raut meets Sharad Pawar: संजय राऊतांनी(Sanjay Raut)  सिल्व्हर ओकवर शरद पवारांची(Sharad Pawar) भेट घेतलीय. जेलमधून सुटल्यानंतर राऊतांनी आज सकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला(Maharashtra Political News Live).

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीची लिंक - https://bit.ly/3tjZvoI

     

  • ICC T-20 World Cup India vs England Match : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T-20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं (Team India) इंग्लंडसमोर (England) विजयासाठी 169 रन्सचं टार्गेट दिलंय. टीम इंडियानं प्रथम बॅटिंग करताना 5 बाद 168 रन्स केल्या. हार्दिक पांड्यानं 63 (Hardik Pandya) तर विराट कोहलीनं 50 (Virat Kohli) रन्सची शानदार खेळी केलीय. 

    बातमीची लिंक -  https://zeenews.india.com/marathi/sports/ind-vs-eng-semi-final-england-n...

  • Uddhav Thackeray on Central Agencies (Maharashtra Political News Live) : केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या (Central Agencies) पाळीव प्राण्यांप्रमाणे वागतात, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलाय. जेलमधून सुटल्यावर संजय राऊतांनी मातोश्रीवर जाऊन आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हा आरोप केला. (Maharashtra Political News Live)

  • Mumbai Alert : देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) पुन्हा दहशतवाद्यांच्या (Terrorist Target) रडावर आलीये.. यावेळी हल्ल्यासाठी दहशतवादी ड्रोन (Drone) किंवा छोट्या विमानांसारख्या साधनांचा वापर करु शकतात असा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी शहरात अलर्ट (Mumbai Police Alert) जारी केलाय. मुंबईत 23 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान हा दक्षतेचा इशारा देण्यात आलाय... या काळात मुंबईत ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आलीये... नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय.

     

  • Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : टीम इंडियाच्या बॅटींगला सुरुवात, रोहित- राहूल उतरले मैदानात.
    भारत : 6/0

  • Sanjay Raut on Devendra Fadanvis (Maharashtra Political News Live) : जेलमधून बाहेर आल्यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) वक्तव्याचं स्वागत केलंय. राजकारणातील (Politics) कटुता संपवली पाहिजे असं काही दिवसांपूर्वीच फडणवीसांनी वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्याबाबत राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलंय. ते उपमुख्यमंत्री असले तरी तेच राज्य चालवतायत, त्यामुळं फडणवीसांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीय. (Maharashtra Political News Live)

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीची लिंक - https://bit.ly/3TqcfVo

     

  • Sanjay Raut (Maharashtra Political News Live) : संजय राऊत (Sanjay Raut) आज शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेण्याची शक्यता आहे...रुग्णालयात रुटीन चेकअप केल्यानंतर दोन्ही नेत्यांची राऊत भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. कालच संजय राऊतांची जेलमधून जामिनावर सुटका झालीय. राऊत आणि पवारांचे स्नेह सर्वांनाच माहिती आहे. पवार दोन दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून बाहेर आलेयत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राऊत सिल्व्हर ओकवर जाण्याची शक्यताय. (Maharashtra Political News Live) 

  • Arunachal Pradesh Earhquake : अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) जाणवले भूकंपाचे (Earthquake) धक्के. भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आलीय. अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. नेपाळनंतरही अरुणाचल प्रदेशही भूकंपानं हादरलं.

  • Maharashtra Kusti :  शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीसपदी बाळासाहेब लांडगेंची नियुक्ती कायम असून ती योग्य आहे असा निर्णय आता हायकोर्टानं दिलाय. राष्ट्रीय कुस्ती संघटनेने महाराष्ट्र कुस्तीगीर समिती बरखास्त केलेली होती त्यानंतर बाळासाहेब लांडगे आणि त्यांचे सहकारी कोर्टामध्ये गेले होते. त्यावर आता कोर्टानं आपला निकाल दिला असून यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.

     

  • Sanjay Raut (Maharashtra Political News Live) : संजय राऊत (Sanjay Raut) आज शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेण्याची शक्यता आहे...रुग्णालयात रुटीन चेकअप केल्यानंतर दोन्ही नेत्यांची राऊत भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. कालच संजय राऊतांची जेलमधून जामिनावर सुटका झालीय. राऊत आणि पवारांचे स्नेह सर्वांनाच माहिती आहे. पवार दोन दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून बाहेर आलेयत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राऊत सिल्व्हर ओकवर जाण्याची शक्यताय. (Maharashtra Political News Live) 

  • Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलात (Fire Brigade Recruitment) 910 पदं भरली जाणार आहेत. डिसेंबरपासून ही भरती सुरू होईल. या भरतीबाबत निविदाही काढण्यात आलीय. उमेदवारांची निवड करण्यासाठी 2 महिने, त्यानंतर प्रशिक्षणासाठी 6 महिन्याचा कालावधी लागेल. मुंबई अग्निशमन दलात मोठ्या प्रमाणात पदं रिक्त असून, उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाचा गाडा हाकला जात होता. त्यातून कर्मचाऱ्यांवर ताण पडत असल्याने पदभरतीचा निर्णय घेण्यात आलाय. 

  • Shirdi Sai Temple Donation : शिर्डीत (Shirdi) साई बाबांच्या (Sai Baba) चरणी भाविकांनी भरभरून दान (Charity) केलंय. दिवाळीच्या सुट्टीत लाखो भाविकांनी शिर्डीत हजेरी लावली. यादरम्यान 15 दिवसांत तब्बल 18 कोटींचे दान साईबाबांच्या झोळीत जमा झालंय. या दानात 29 देशांतील 24 लाख 80 हजार रुपये किमतीच्या परकीय चलनाचाही समावेश आहे. तर 39 लाख 53 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने भाविकांनी दान केलंय.

    बातमीची लिंक - https://bit.ly/3UCcUnO

  • Sania Mirza & Shoaib Malik Divorce :  भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांनी वेगळं होण्याचं ठरवलंय. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झालंय शोएब मलिकच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाबाबत (Divorce) माहिती दिलीये. दोघंही वेगळे राहात असून केवळ कागदोपत्री औपचारिकता बाकी असल्याचं त्यानं सांगितलंय. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती. 

  • OBC Reservation (Maharashtra Political News Live) : ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Reservation) आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात (Local Body Election) आज सुप्रीम कोर्टात (supreme court) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने दोन आठवड्याचा अधिक वेळ मागितला होता.  त्यानुसार कोर्टानं दोन आठवड्याचा वेळ वाढवून दिला. आता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यात राज्य सरकारला आपली बाजू मांडावी लागणार आहे. मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबतच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं प्रभाग रचनेबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्याबाबत याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यानुसार मुंबई हायकोर्टात पुढील  लढाई लढावी लागणार आहे. (Maharashtra Political News Live)

     

  • One Nation One Election (Maharashtra Political News Live) : देशात 2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Loksabha & Vidhansabha Election) एकत्रित घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) तयारी आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी स्पष्ट केलंय. केंद्र सरकारने (Central Government) पुढाकार घेतल्यास वन नेशन, वन इलेक्शनची (One Nation One Election) तयारी केली जाईल असंही निवडणूक आयुक्तांनी म्हटलंय. One Nation One Election (Maharashtra Political News Live)

  • Pratapgad Afzal Khan Kabar : प्रतापगडावर (Pratapgad) असलेल्या अफजल खानाच्या कबरीच्या (Afzal Khan kabar) आजूबाजूला अनधिकृत बांधकाम (Illegal Construction) हटवलं जातंय. अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी शासकीय वाहनांचा ताफा दाखल झाला असून, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. प्रतापगडावर अफजल खानाच्या (Afzal Khan) कबरीच्या भोवती उदात्तीकरण झाले होते. त्यामुळे कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू झालीय. आजच्या दिवशीच म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. शिवप्रतापदिनीच अफजल खानाच्या कबरीजवळील कबर म्हणजेच अनधिकृत बांधकाम हटवलं जातंय.

  • Sanajay Raut (Maharashtra Political News Live) : संजय राऊतांना (Sanjay Raut) हायकोर्टानं (High Court) दिलासा दिलाय. मात्र ईडीच्या (ED) याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला. राऊतांच्या जामिनावर महिनाभर झालेल्या युक्तिवादानंतर पीएमएलए कोर्टानं जामीन मंजूर केला. हायकोर्ट एका तासात तो निर्णय कसा बदलू शकते, असा सवाल कोर्टानं ईडीच्या वकिलांना विचारला. यावर तातडीने सुनावणी घेणं शक्य नाही... कोर्टाची वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे आज सुनावणी घेण्यात येईल, असं कोर्टानं स्पष्ट केलं. (Maharashtra Political News Live)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link