IND vs ENG : ऑस्ट्रेलियाच्या एडिलेड मैदानावर भारत विरूद्ध इंग्लंडच्या सेमीफायनलचा थरार रंगलाय. दुसऱ्या सेमी फायनलचा टॉस इंग्लंडचा (England) कर्णधार जोस (Jos Buttler) जिंकला आहे. इंग्लंडने प्रथम फिल्डींग करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. इंग्लंडने प्रथम फिल्डींग करत टीम इंडियाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 168 रन्स केले. इंग्लंडला जिंकण्यासाठी 169 रन्सची आवश्यकता आहे.
आजच्या सामन्यात पुन्हा एकदा किंग विराट कोहलीची बॅट तळपळी. या सामन्यात विराटने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली. तर हार्दिक पांड्यानेही त्याला यावेळी साथ दिली.
हार्दिक पांड्याने सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी केलीये. टीम इंडिया अडचणीत असताना हार्दिकने तुफान फलंदाजी करत अवघ्या 33 बॉलमध्ये 63 रन्स केले. यादरम्यान हार्दिक पांड्याने 4 फोर आणि 5 सिक्स मारले. हार्दिकची खेळी नसती तर कदाचित टीमला खूप संघर्ष करावा लागला असता.
टीम इंडीया प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद