Maharashtra Politics | Marathi News LIVE : मविआची एकत्रित पत्रकार परिषद
Maharashtra News | Marathi News LIVE Today: दिवसभरातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई पुणे नागपूरसह राज्यातील महत्त्वाची शहरं व गावांतील ताज्या बातम्या, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रिकेट, फिफा विश्वचषक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर...
Latest Updates
17 डिसेंबरला मविआ महामोर्चा काढणार
Uddhav Thackeray | Maharashtra Politics : राज्यपाल कोश्यारींविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झालीय. राज्यपालांविरोधात तसंच महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या प्रत्येकाविरोधात एकजूट व्हा असं आवाहन करत मविआनं मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केलीय. महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा काढणार. उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत अशा मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.
बातमी पाहा - https://bit.ly/3UBiru6
मविआ नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद
Uddhav Thackeray | Maharashtra Political News : महाराष्ट्राची सतत अवहेलना केली जातेय - उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray). गद्दारी, कट कारस्थानानं करून मविआचं सरकार पाडलं, महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न सुरूय - उद्धव ठाकरे. कर्नाटकनं इशारा देताच दौरा रद्द हा महाराष्ट्र सरकारचा नेभळटपणा, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल.
बातमी पाहा - https://bit.ly/3UBiru6
जतमधील गावं कर्नाटकात जाणार नाहीत
Uday Samant on Jat Water | Maharashtra Political News : सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातील 42 गावं कर्नाटकात जाण्याचा वाद अखेर मिटलाय. पाण्यापासून वंचित असलेल्या 42 गावातील दुष्काळग्रस्तांशी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी आज थेट संवाद साधला. म्हैसाळ विस्तारीत पाणी योजना लवकर पूर्ण होईल आणि तोपर्यंत 42 गावांना पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली. तेव्हा पाणी मिळालं तर कर्नाटकात जाणार नाही, असं पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार (Sunil Potdar) यांनी स्पष्ट केलं. सरकारनं आश्वासन पाळलं तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, असंही ते म्हणाले.
बातमी पाहा - https://bit.ly/3Fp5oYm
समृद्धा महामार्गावर भरावा लागणार एवढा टोल
Samruddhi Expressway Toll Rate | Marathi News LIVE : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 11 तारखेला लोकार्पण होणार आहे. यावेळी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway) नेमका किती टोल भरावा लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे...समृद्धी महामार्गावर प्रति किलोमीटर चार चाकी वाहनांसाठी 1 रुपये 73 पैसे टोल आकारणी राहणार आहे...म्हणजे नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या 520 किमी अंतरासाठी 900 रुपये टोलदर आहे...
बातमी पाहा - समृद्धी महामार्गावर 'ही' असणार टोल देयकाची रक्कम; पाहा व्हिडिओ
आफताबला फाशीवर पोहोचवणार 5 पुरावे
Shraddha Walkar Murder Update : श्रद्धा हत्याकांडात फाशी होण्यापासून आफताब आता काही पावलंच दूर आहे. कारण आफताबला (Aftab) फाशीवर पोहचवणारे 5 महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. श्रद्धाची हत्या आफताबनेच केल्याचे हे पुरावे आहेत. विशेष म्हणजे श्रद्धाच्या (Shraddha Walkar) जबड्याचे अवशेष हा यातला सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. या जबड्यात दातांमध्ये मेटलचा तुकडा सापडलाय, जो मुंबईतल्या एका डॉक्टरने बसवला होता. त्यामुळे पोलिसांना आता श्रद्धाच्या डीएनए अहवालाची (Shraddha Walkar DNA Report) प्रतीक्षा आहे. पोलिसांनी श्रद्धाची अंगठीही ताब्यात घेतलीय. श्रद्धाच्या हत्येनंतर ही अंगठी आफताबने त्याच्या दुस-या गर्लफ्रेंडला दिली होती. पोलिसांनी डॉक्टर्सचे जबाबही नोंदवले आहेत. यात श्रद्धाच्या दातांमध्ये मेटलचा तुकडा बसवणारा डॉक्टर... तसंच चाकूमुळे हात कापल्यानंतर आफताबवर उपचार करणा-या डॉक्टरचा समावेश आहे.
बातमी पाहा - आफताबला फासावर लटकवणार 'हे' 5 पुरावे
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गट आक्रमक
Maharashtra GramPanchayat Election : राज्यात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटानंही (Shinde Group) कंबर कसलीय. बुधवारी ग्रामपंचायत निवडणुकीच्य तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) नंदनवन निवासस्थानी दिवसभर विभागनिहाय आढावा बैठक पार पडणार आहे.
बातमी पाहा - ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी 'या' दिवशी आखणार नवा प्लॅन
मंत्र्यांचा कर्नाटक दौरा रद्द
Maharashtra - Karnatak Border Dispute | Minister Karnatak Tour Cancel : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचा उद्याचा कर्नाटक दौरा रद्द झालाय...दौरा रद्द झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी (DCM Devendra Fadanvis) दिलीय...सीमावादाचा निर्णय सुप्रीम कोर्ट (Supreme Court) घेईल, आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखु शकत नाही असं ते म्हणाले... यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. दरम्यान कर्नाटक मुख्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलंय. कायदा सुव्यवस्थेच्या कारणामुळे दोन कॅबिनेट मंत्र्यांनी बेळगाव दौरा करु नये, असं या पत्रात म्हटलंय.
बातमी पाहा - "कोणी रोखू शकत नाही पण..."; बेळगाव दौरा रद्द झाल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
एकनाथ शिंदे आणि जे.पी.नड्डांची भेट
Eknath Shinde Meet J.P.Nadda | Maratahi News LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात बैठक झाली. दिल्लीत (Delhi) दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत ही भेट झाल्याची माहिती समजतेय.
होम, कार लोनचा ईएमआय वाढणार?
RBI News | Marathi News LIVE : सर्वसामान्यांना लवकरच मोठा झटका बसू शकतो. कारण रिझर्व्ह बँक (RBI) रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. आजपासून ते 7 डिसेंबरपर्यंत पतधोरण आढाव्याबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. यात रेपो रेट वाढीबाबत (Repo Rate) चर्चा करुन 7 डिसेंबरला घोषणा होण्याची शक्यता आहे. व्याजदर 0.25 ते 0.35 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलाय. त्यामुळे होम लोनसह कार लोनचा ईएमआय वाढण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा भार पडू शकतो.
संजय राऊतांचा भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल
Sanjay Raut On BJP | Marathi News LIVE : शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं राज्यपालांवर (Bhagat Singh Koshyari) अजूनही कारवाई झालेली नाहीये...त्यावरून राऊतांनी भाजप, शिंदे गटावर निशाणा साधलाय...राजभवनात जाऊन चहा, बिस्कीट न खाता राज्यपालांना (Governor of Maharashtra) जाब विचारा...त्यांना कारे करून दाखवा, पण, भाजपच्या मनगटात हिंमत नसल्याचं राऊतांनी म्हटलंय...तर सीमावादाबाबत दोन मंत्र्यांनी कर्नाटक नव्हे पण, सीमारेषेला तरी स्पर्श करून यावं असं आव्हान राऊतांनी (Sanjay Raut) दिलंय...
बातमी पाहा - "राजभवनात घुसून राज्यपालांची बिस्किटं न खाता..."; संजय राऊतांनी भाजपला सुनावलं
मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार?
Vasant More & Ajit Pawar | Marathi News LIVE : पुण्यातले मनसे नेते आणि राज ठाकरेंचे कट्टर समर्थक वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार का याची जोरदार चर्चा सुरु झालीय. कारण थेट अजित पवारांनीच (Ajit Pawar) वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिल्याचं समजतंय. पुण्यातल्या एका विवाहसोहळ्यात अजित पवारांसोबत वसंत मोरेंची (Vasant More) भेट झाली. तेव्हा तात्या कधी येताय, वाट पाहतोय या शब्दांत अजित पवारांनी वसंत मोरेंना खुली ऑफर दिल्याचं समजतंय. वसंत मोरे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आल्याचं मान्य केलंय. वसंत मोरे सध्या मनसेवर नाराज असल्याचं समजतंय. त्यामुळे आता ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
बातमी पाहा - 'तात्या कधी येताय... वाट पाहतोय', अजितदादांची वसंत मोरे यांना खुली ऑफर
अमरावतीमध्ये 150 जणांना विषबाधा
Amravati Food Poison | Marathi News LIVE : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथं 100 ते 150 नागरिकांना विषबाधा (Food Poison) झालीय. एका समारंभात जेवण केल्यानंतर विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला. अचलपूरमधील प्रहार पक्षाचे माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम (Engagement Ceremony)आयोजित करण्यात आला होता. जेवणानंतर काही महिला, पुरुष आणि बालकांना अचानक मळमळ, उलट्या, ताप व अतिसार होऊ लागला. यामुळे शंभर ते दीडशे नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी अचानक एवढे रुग्ण भरती झाल्याने रुग्णालयात एकच तारांबळ उडाली होती. सध्या सर्व रुग्णांची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय.
बातमी पाहा - साखरपुड्याचे जेवण बेतलं असतं जीवावर; दीडशे पाहुण्यांना झाली विषबाधा
संभाजीनगरमध्ये संतापजनक प्रकार, वृद्ध महिलेला नग्न करुन मारहाण
Sambhajinagar Crime News | Marathi News LIVE : संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी, नातवाने मुलगी पळवली म्हणून त्याच्या आजीला (Old Woman Beaten) विवस्त्र करुन मारहाण करण्यात आलीय. एवढंच नाही त्याचा व्हिडिओसुद्धा बनवण्यात आलाय बातमीचा व्हिडिओ पाहा. ओझर गावातली ही संतापजनक घटना आहे. विवेक उर्फ चवल्या पिंपळे याच्यासह दोघांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. गंगापूर फाट्यावर ही महिला राहते. तीच्या नातवाने मुलीला पळवून आणलं असा आरोप करत सदर आरोपी घरी आला. आणि या वृद्ध महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप आहे. गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बातमी पाहा - धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ
गुजरातचा रणसंग्राम
Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये दुस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरुय. दुस-या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान सुरु असून 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अहमदाबादमधल्या रानिपच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला पाहा बातमीचा व्हिडिओ. मोदींनी गुजरातवासियांना मतदानाचं आवाहन केलंय. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि ‘आप’प्रमाणेच काही प्रादेशिक पक्षही स्वतःचं भवितव्य आजमावत आहेत. उत्तर आणि मध्य गुजरातमधील14 जिल्ह्यांत दुस-या टप्प्यातील मतदान पार पडतंय. यामध्ये अहमदाबाद, बडोदा आणि गांधीनगर आदी महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुस-या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि आणि अल्पेश ठाकोर यांच्या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असेल. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 89 जागांसाठीचं पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरलाच पार पडलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी 63.31 टक्के मतदान झालं होतं.
बातमी पाहा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
गुजरातचा रणसंग्राम
Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये दुस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरुय. दुस-या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान सुरु असून 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि ‘आप’प्रमाणेच काही प्रादेशिक पक्षही स्वतःचं भवितव्य आजमावत आहेत. उत्तर आणि मध्य गुजरातमधील14 जिल्ह्यांत दुस-या टप्प्यातील मतदान पार पडतंय. यामध्ये अहमदाबाद, बडोदा आणि गांधीनगर आदी महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुस-या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel), पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) आणि आणि अल्पेश ठाकोर यांच्या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असेल. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 89 जागांसाठीचं पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरलाच पार पडलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी 63.31 टक्के मतदान झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातवासींना मतदान करण्याचं आवाहन केलंय.
बातमी पाहा - गुजरात विधानसभेसाठी PM Modi यांनी केलं मतदान
मंत्र्यांचा उद्याचा बेळगाव दौरा रद्द
Maharashtra - Karnatak Border Dispute | Marathi News LIVE : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचा उद्याचा बेळगाव दौरा (Belgum Tour) रद्द केलाय...सीमावादाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnatak Chief Minister Basavaraj Bommai) रोज कुरापती काढत असताना राज्य सरकारने माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय...सोलापुरातील अक्कलकोट, सांगलीतील जत गावांवर कर्नाटकने दावा केलाय...त्यामुळे कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्यासाठी सीमा प्रश्नावर समन्वयासाठी मंत्री समितीचे चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई उद्या कर्नाटकात जाणार होते...पण, त्याआधीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा दौरा रद्द करावी अशी सूचना बोम्मईंनी केली होती...त्यामुळे राज्य सरकारने माघार घेतलीय...
बातमी पाहा - बोम्मई यांच्या इशारानंतर शिंदेंच्या मंत्र्यांचा कर्नाटक दौरा रद्द
मुंबई फायर ब्रिगेडमध्ये लवकरच भरती
Mumbai News | Marathi News LIVE : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी... कारण मुंबई फायर ब्रिगेडमध्ये (Jobs in Fire Brigade) आता मेगाभरती होणार आहे. लवकरच फायर ब्रिगेडच्या 910 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पोलीस भरतीप्रमाणेच वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात आलीय. खुल्या गटासाठी 25 ऐवजी 27 तर आरक्षणासाठी 30 ऐवजी 32 वर्षांची वयोमर्यादा असेल. बारावी उत्तीर्ण उमेदवारांची शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर भरती केली जाईल. पण प्रत्यक्ष रुजु होण्यास वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
बातमी पाहा - अग्निशमन दलात नोकरीची मोठी संधी, पाहा कसा कराल अर्ज
सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक
Mumbai News | Marathi News LIVE : मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) अडीच कोटींचं सोनं जप्त करण्यात आलंय...कस्टम विभागाने (Custom Department) ही मोठी कारवाई केलीय...दोन कारवाईत साडे चार किलोंचं सोनं जप्त (Gold Seized) केलंय...तस्करी करणा-यांनी अंडरगारमेंट्समध्ये 1872 ग्रॅम सोनं लपवून ठेवलं होतं...तर दुस-या कारवाई फ्लाईटमधील टॉयलेटमध्ये लपवून ठेवलं अडीच किलो सोनं हस्तगत केलंय...या कारवाईत 3 जणांना अटक केलीय...हे जप्त केलेलं सोनं कुठून आणलं...? कुठे घेऊन चालले होते याचा तपास सुरूये...
बातमी पाहा - बापरे! साडे चार किलो सोनं मुंबई विमानतळावर जप्त; कुठे ठेवलं होतं सोनं
आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली! या तारखेला होणार भराडी देवीची जत्रा
Sindhudurga News | Marathi News LIVE : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या जत्रेची (Anganewadi Jatra) तारीख ठरलीय. यंदाचा भराडीदेवीचा जत्रोत्सव 4 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे...मालवणच्या आंगणे कुटुंबीयांनी या जत्रेची माहिती दिलीय.
बातमी पाहा - आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली! या तारखेला होणार भराडी देवीची जत्रा
जुळ्या बहिणींशी लग्न नवरेदवाच्या अंगलट
Pandharpur Twin Marriage | Marathi News LIVE : सोलापुरमधील जुळ्या बहिणीनीं एकाच मुलाशी लग्न केलं. पण आता हे लग्न करणं नवरदेव अतुल आवतडेच्या अंगलट आलंय. अकलूज पोलीस स्टेशनमध्ये नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल झालाच आहे. पण आता महिला आयोगानेही कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरुन (Rupali Chakankar Tweet) ही माहिती दिलीय. सोलापूर पोलीस अधीक्षकांनाही यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. अकलूज पोलीस स्टेशनमध्ये कालच नवरदेवाविरोधात आयपीसी कलम 494 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पती किंवा पत्नी जिवंत असताना किंवा घटस्फोट न घेता पुनर्विवाह करणे हा IPC च्या कलम 494 अंतर्गत गुन्हा मानला जातो. यामध्ये गुन्हेगाराला 7 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
गोवर लसीचा अतिरिक्त डोस आवश्यकच
Measles Vaccine | Marathi News LIVE : राज्यात गोवरनं उद्रेक केलाय. पण गोवरला आळा घालायचा असेल तर लस (Govar Vaccine) घेण्याचं आवाहन डॉक्टर्स करतायत. गोवरची लस देताना एक डोस दिल्यानंतर चार आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जातो. पण एखाद्या प्रकरणात पहिल्या डोसनंतर काहीच दिवसांत दुसरा डोस घेतल्यास त्याचा दुष्परिणाम होणार नाही.. असा दावा बालरोगतज्ज्ञांनी केलाय. तर लसींच्या वेळापत्रकानुसार बाळाला पोलिओची लस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला पोलिओची लस देता येते. तीच पद्धत सध्या गोवरच्या लसीकरणांसाठी वापरण्यात येत असल्याचं जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितलंय.
बातमी पाहा - गोवरवर मात करण्यासाठी चिमुरड्यांना अतिरिक्त डोस मिळणे आवश्यक; वैज्ञकीय तज्ज्ञ असे का म्हणतायत पाहा
गोवरबाबत टास्क फोर्स आज करणार अॅक्शन प्लॅन
Maharashta Measles Outbreak | Marathi News LIVE : राज्यभरात गोवरचा फैलाव झालाय. गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सची आज बैठक (Task Force Meeting) बोलावण्यात आलीय. या बैठकीत खासगी वैद्यकीय यंत्रणांचाही सहभाग असेल. गोवरचा (Govar) मोठ्या प्रमाणात फैलाव झालेले जिल्हे, कुपोषण अधिक असलेले भाग, लसवंचित बालकं या प्रमुख मुद्द्यांचा विचार करून अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. राज्यात गोवरमुळे आतापर्यंत 18 मुलांचा मृत्यू झालाय तर रुग्णांची संख्या 823वर पोहोचलीय. तर संशयित रूग्णांची संख्या 12 हजारावर गेलीय. राज्यात यावर्षी एकूण 93 ठिकाणी गोवरचा उद्रेक झालाय. टास्क फोर्स आणि गोवर मृत्यू विश्लेषण समितीच्या निरिक्षणाप्रमाणे गोवरमुळे होणा-या मृत्यूंमध्ये कुपोषण आणि लसीकरणाचा अभाव ही प्रमुख कारणं आढळली आहेत. त्यामुळे गोवरमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी कुपोषित मुलांवर अधिक लक्ष दिलं जाणार आहे.