Vasant More: 'तात्या कधी येताय... वाट पाहतोय', अजितदादांची वसंत मोरे यांना खुली ऑफर!

MNS leader Vasant More latest news: एका विवाह सोहळ्यात वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत (NCP Pune) येण्याची ऑफर दिली.

Updated: Dec 4, 2022, 11:50 PM IST
Vasant More: 'तात्या कधी येताय... वाट पाहतोय', अजितदादांची वसंत मोरे यांना खुली ऑफर!
Ajit Pawar,Vasant More

Vasant More, Ajit Pawar: अनेक वेळा पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या (Pune MNS) कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार की काय?, अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP) येण्याची थेट ऑफर दिली आहे. अजितदादांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

अजित पवार यांची खुली ऑफर ?

एका विवाह सोहळ्यात वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत (NCP Pune) येण्याची ऑफर दिली. तात्या कधी येता... वाट पाहतोय, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे (Vasant More On Ajit Pawar) यांनी देखील दुजोरा दिला आहे. (Ajit Pawar open offer to Vasant More to join the ncp pune news)

आगामी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Election) निवडणुकीपूर्वी वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यानं मनसेचं टेन्शन वाढलंय. वसंच मोरे म्हणजे पुण्यातील मनसेचा चेहरा. त्यामुळे वसंत मोरे यांना नाराज करणं मनसेला परवडणारं नाही. तसेच मनसे सोडणार नसल्याचं देखील वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा - या एका कारणावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा वाद होणार? खासदाराची उमेदवारी धोक्यात

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, वसंत मोरे यांना राज ठाकरेंची ही भूमिका रुचली नाही. त्यावेळी त्यांनी थेट राज ठाकरेंच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपलं म्हणणं बोलून दाखवलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांना शहराध्यक्ष नियुक्त केलं होतं. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा होती.