साखरपुड्याचे जेवण बेतलं असतं जीवावर; दीडशे पाहुण्यांना झाली विषबाधा

Food Poisoning : एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मुलीच्या सारखपुड्याच्या कार्यक्रमानंतर हा सर्व प्रकार घडलाय. रुग्णालयात एकाच वेळी इतके रुग्ण आल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली

Updated: Dec 5, 2022, 09:09 AM IST
साखरपुड्याचे जेवण बेतलं असतं जीवावर; दीडशे पाहुण्यांना झाली विषबाधा title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : गेल्या काही दिवसापासून सर्वच ठिकाणी लग्नाचा (marriage) धुमधडाका उडाला आहे. मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडत आहे. अनेक ठिकाणी साखपुड्याचे कार्यक्रम पार पडत आहेत. अशावेळी या कार्यक्रमांमध्ये जेवणाची बरीच चंगळ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक जण अगदी चवीने या जेवणावर ताव मारताना दिसतात. पण एका साखरपुड्याच्या (engagement ceremony) कार्यक्रमात पाहुण्यांना जेवणातून विषबाधा (food poisoning) झाल्याचे समोर आले आहे. साखरपुड्यात जेवणानंतर शंभर ते दीडशे जणांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे एका साखरपुडा समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे शंभर ते दीडशे नागरिकांना अन्नातून विषबाधा विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अचलपूर येथील प्रहार पक्षाचे माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अष्टमासिद्धी येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

हे ही वाचा >> लग्नसभारंभातील मज्जा आली अंगलट! चवीष्ट, चवदार जेवणच ठरलं जीवघेणं...

या साखरपुडा समारंभासाठी वधू-वरांकडील नातेवाईकांसह मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. यावेळी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर काही महिला, पुरुष व बालकांना अचानक मळमळ, उलट्या, ताप व अतिसाराचा त्रास होऊ लागला. यामुळे शंभर ते दीडशे नागरिकांनी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी अचानक एवढे रुग्ण भरती झाल्याने रुग्णालयात एकच तारांबळ उडाली होती. सध्या सर्व रुग्णांची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

भंडाऱ्यातही 200 जणांना विषबाधा

काही दिवसांपूर्वी लग्न स्वागत सोहळ्यातील अन्नातून सुमारे 200 जणांना विषबाधा होण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सरांडी (sarandi) बुज येथे समोर आला होता. रात्री जेवण केल्यानंतर काहींना त्रास व्हायला लागला तर अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाल्याने खासगी रुग्णालयासह (private hospital) प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary health centre) उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.