Coastal Road :  कोस्टल रोड (Coastal Road) हा मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे.  कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखद झाला आहे. मात्र, उद्घाटनानंनतर अवघ्या महिनाभरातच कोस्टल रोडची धोकादायक अवस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोस्टल रोडला कनेक्ट असलेल्या भुयारी मार्गात अर्थात अंडरपासमध्ये लाटांचे पाणी शिरले होते. यामुळे हा भुयारी मार्ग बंद ठेवम्यात आला होता. यानंतक आता  कोस्टल रोडला तडे गेले आहेत. यामुळे कोस्टल रोडच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच पावसाळ्यात कोस्टल रोडची स्थिती काय होईल असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेने तब्बल 14 हजार कोटी रूपये खर्चून कोस्टल रोड बांधला. अवघ्या एक महिन्यांपूर्वी उट्घाटन केलेल्या कोस्टल रोडच्या काँक्रीट रोडवर भेगा पडल्या आहेत. मरिन ड्राईव्हच्या एक्झिट रॅम्पवर या भेगा पडल्या आहेत. त्यामुळं कोस्टल रोड कामाच्या दर्जेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 


हाजी अली दर्गाचे दर्शन बंद


कोस्टल रोडला कनेक्ट भुयारी मार्ग बनवण्या आला आहे. या भुयारी मार्गातूनच कोस्टल रोडजवळ समुद्रात असलेल्या हाजीअली दर्गा पर्यंत जाण्याचा मार्ग आहे. मात्र, समुद्रात मोठी भरती आल्यामुळे लाटांचे पाणी अंडरपासमध्ये शिरले. यामुळे अंडरपास बंद करण्यात आला. परिणामी हाजी अली दर्गाचे दर्शन देखील बंद झाले. हाजी अली दर्गा येथे दर्शनासाठी नेहमीच लोकांची गर्दी असते.  सध्या हा भुयारी मार्गच हाजी अली दर्गा पर्यंत जाण्याचा मार्ग आहे. मात्र, भुयारी मार्गात लांटांचे पाणी शिरल्याने हा मार्ग बंद करण्यात आला. भुयारी मार्गाजवळ भरती आल्यास अतिरीक्त पाण्याचा निचरा होईल अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही असा आरोप  हाजीअली दर्गा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. 


असा आहे कोस्टल रोड


कोस्टल रोडचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वरळी ते मरीन लाइन्सपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोस्टल रोडमुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर केवळ आठ मिनिटात पार करता येत आहे. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.  वरळी ते मरीन ड्राईव्ह असा 9 किलोमीटरचा हा कोस्टल रोड आहे. या चारपदरी मार्गावर ताशी 80 ते 100 किमी असा स्पीड लिमीट ठेण्यात आला आहे. कोस्टल रोडवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रोडवर एन्ट्री, एक्झीट, बोगद्यासह 24 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. भुयारी मार्गावर प्रत्येक 100 मीटरवर पब्लिक अॅड्रेस स्पिकर बसवण्यात आलेत.