सोनू भिडे, नाशिक- अटींची पूर्तता न केल्याने नाशिक मधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला २२ अभ्यासक्रम  बंद करावे लागले आहे. यात सहा महिने, एक वर्ष आणि तीन वर्ष्याच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाला तांत्रिक आणि पूर्णवेळ अभ्यासक्रम राबविण्याची परवानगी नसताना सुद्धा हे अभ्यासक्रम राबविल्याने २२ अभ्यासक्रम बंद करावे लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुक्त विद्यापीठ
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना १९८९ मध्ये झाली आहे. याचे मुख्य केंद्र नाशिक मध्ये असून आठ विभागीय केंद्र आहेत. या विद्यापीठात दहावी आणि बारावी नापास झालेले विद्यार्थी पुढील शिक्षण पूर्ण करू शकतात. विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी एकाच वेळी दोन शिक्षणक्रम पूर्ण करू शकतात. मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना यूजीसी आणि राज्य सरकारची मान्यता आहे. 


या कारणाने बंद करावा लागला अभ्यासक्रम
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियम आणि अटी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सहा महिने, एक वर्ष तीन वर्षाचे अनेक अभ्यासक्रम आहेत. गेली कित्येक वर्ष या विद्यापीठात ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमात तांत्रिक आणि पूर्णवेळ चालणारे अभ्यासक्रम सुद्धा सुरु करण्यात आले होते. मात्र यूजीसीचे नियम आणि अटींचे पालन न केल्याने अभ्यासक्रमांना बंद करण्याचे आदेश दिले होते. तरीही विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरु असल्याची तक्रार युजीसीकडे वारंवार करण्यात आली. अखेर युजीसीने विद्यापीठातील बऱ्याच  वर्षापासून सुरु असलेले २२ अभ्यासक्रम बंद करण्याचे जाहीर केले आहे. मात्र या निर्णयाने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून त्यांना इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.


कोणते अभ्यासक्रम होणार बंद


युजीसीने जाहीर केलेल्या निर्णयानुसार विद्यापीठातील खालील विविध प्रकारचे अभ्यासक्रम बंद होणार आहेत.