shankarrao chavan hospital nanded :  नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या  गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. तर, सर्पदंश आणि विषबाधेमुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्पदंश आणि विषबाधेमुळे 12 जणांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत आम्ही शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी या मृतांमध्ये बाह्य रुग्णांचा अधिक समावेश असल्याचे बोलून वेळ मारून नेला. आता या प्रकरणात सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.


रुग्णालय प्रशासनाचा खुलासा


70 ते 82 परिसरात असे मोठे रुग्णालय नाही. यामुळे या परिसरातील सर्व येथेच उपचारासाठी येतात. 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. यापैकी 6 मुलं तर 6 मुली आहेत. तर, इतर 12 जण प्रौढ आहेत. या रुग्णालयात किरकोळ आजारासह प्रामुख्याने सर्पदंश झालेले रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. सर्प दंशावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या हाफकिन संस्थेच्या माध्यमातून सर्पदंशावरील औषध मागवली जातात. सध्या काही प्रमाणात येथे  सर्पदंशावरील औषधांची कमतरता आहे. मात्र, रुग्णांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक पातळीवर देखील  सर्पदंशावरील औषध मागवून रुग्णावर उपचार केला जातो.  मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येथे येत असल्याने रुग्णालयावर ताण असल्याचा खुलासा नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे यांनी केला आहे.


ठाण्यातल्या कळवा रूग्णालयातही झाला होता 36 तासांत 22 जणांचा


ठाण्यातल्या कळवा रूग्णालयात देखील असाच प्रकारची घटना घडली होती.  अवघ्या 36 तासांत 22 जणांचा मृत्यू झाला होता. विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आल्यानं, त्याचा ताण कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर येत असल्याचं कारण प्रशासनाने दिले होते. मात्र हे रुग्णालय जरी बंद झालं असलं तरी ते इतर ठिकाणी स्थलांतरीत केल्याची माहितीच कुठे देण्यात आली नव्हती.