Deepak Kesarkar : शिंदे गटाचे नेते तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) सध्या चांगलेच चर्चेच आहेत ते त्यांनी केलेल्या एका  खळबळजनक गौप्यस्फोटमुळे. शाळेला परवानगी देण्यासाठी एजंटनं 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा मोठा गौप्यस्फोट यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यांच्या गौप्यस्फोटानंतर चर्चेला उधाण आले आहे. 


शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नेमका काय गौप्यस्फोट केलाय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेला परवानगी देण्यासाठी एजंटनं 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा मोठा गौप्यस्फोट शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी केलाय.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपांना उत्तर देताना केसरकरांनी हा खुलासा केला आहे. मंत्रालयात दलालांचा सुळसुळाट असून एक मोठा दलाल मंत्रालयातली कामं करतो असा आरोप पटोलेंनी केला होता. त्याला उत्तर देताना केसरकरांनी हा गौप्यस्फोट केला. आम्हाला एजटांची नावं द्या आम्ही कारवाई करतो असं आव्हानही त्यांनी पटोलेंना दिलं. 


नाना पटोले यांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. मंत्रालयाजवळच्या निर्मल बिल्डींगमध्ये या सरकारचा सर्वात मोठा दलाल बसतो, असा घणाघाती आरोप पटोलेंनी केला होता. या दलालाचं रेकॉर्डिंग काँग्रेसकडे आहे. येत्या अधिवेशनात त्याचा भांडाफोड करणार असल्याचा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलाय. तर त्या दलालाचं नावं सांगावं, उगाच आरोप नकोत. नाव सांगितलं तर कारवाई करु असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. तसेच, एजंटसची नावं द्या, कारवाई करतो असं म्हणत केसरकर यांनी देखील पटोलेंना आव्हान दिले आहे.  


दिवसा शाळा रात्री गौतमीचा डान्स


नाशिकच्या दिंडोरीमध्ये चक्क जिल्हापरिषदेच्या शाळेतच गौतमी पाटीलचा डान्स आयोजित करण्यात आला होता. दिवसा शाळा भरली होती. त्यानंतर संध्याकाळी शाळेतील मैदानात भव्य स्टेज उभारून गौतमी पाटलाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे दारुच्या विविध ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेल्या सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतलीये.


6 वीपासून विद्यार्थ्यांची सायकोमेट्री टेस्ट


6 वीपासून विद्यार्थ्यांची सायकोमेट्री टेस्ट केली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला हिंसकपणा लक्षात घेता विद्यार्थ्यांची सायकोमेट्री टेस्ट केली जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. कोविडनंतर शाळांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल झालाय. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला असून एकटे राहणे, अचानक हिंसक वर्तन करणे असे प्रकार समोर येत आहेत .त्यामुळे मोबाईलमधून मुलं पुस्तकांकडे वळावेत, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी बालमानसोपचार तज्ज्ञांच्या संघटनेसोबत करार केला जाईल.अशी माहिती केसरकरांनी दिली होती.