पिंपरी चिंचवड : आता बातमी झी इम्पॅक्टची...पिंपरी चिंचवडमध्ये ४९ लाख रुपयांचा रस्ता गायब झाल्याची बातमी झी २४ तासने दाखवली होती... या बातमीनंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि या गायब रस्त्याचं काम सुरु झालं आहे.


रस्ता पूर्ण झाल्याचं कागदावर दाखवलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाटणी काळेवाडी दरम्यानच्या रस्त्याची अवस्था काही दिवसांपूर्वी अशी होती. तिथं १८ मीटर डांबरी रस्ता हवा होता. प्रत्यक्षात तिथे कामच झाले नव्हते.. पण तरीही या रस्त्यासाठी लागणारा ४९ लाख रुपयांचा निधी महापालिकेने ठेकेदाराला दिला आणि रस्ता पूर्ण झाल्याचा दाखलाही ठेकेदाराला दिला. 


रस्ता परतला रे परतला


हे वृत्त झी २४ तासने दाखवलं आणि महापालिकेला जाग आली आणि आता इथे काम सुरू झालं आहे. यामुळे नागरिकांना होणारा त्रास तर वाचणारच आहे, पण ४९ लाखाचं काम जे लपवलं जात आहे, ते करावं लागणार आहे.