Dhananjay Munde : नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असे देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. लातूर मध्ये त्यांनी ही माहीती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयांचे पेकेज सरकारने जाहीर केल आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लातूर मध्ये केली आहे. कापसाचे मात्र क्विंटल वर द्यायचं की हेक्टरवर द्यायचं हे फक्त ठरवायचं राहिले आहे. हे पैसे 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.


ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमतीती मोठी वाढ झालीये. त्यामुळे शेतक-यांवर त्याचा आर्थिक भार पडू लागलाय. वाशिम जिल्ह्यात खरिपाची पेरणी सुरु  होणार आहे. मात्र त्यापूर्वी खतांचा बेसल डोस द्यावा लागतो.. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. मिश्र खतं, सुपर पोटॅशच्या दरातही मोठी वाढ झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत.


कांदा निर्यात बंदीच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकरी संतप्त


केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकरी वर्गामध्ये रोष पहायला मिळतोय..  केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवलीय मात्र निर्यातीवर 550 डॉलर निर्यात शुल्क लावण्यात आलाय़ आणि याचा थेट परिणाम बाजारभावावर झालाय... 'कभी खुशी कभी गम' अशी परिस्थिती शेतक-यांमध्ये पहायला मिळतेय. कांदा निर्यात खुली केल्याचं कांदा उत्पादक संघटनेनं स्वागत केलंय मात्र कोणत्याही अटी-शर्तींशिवाय, निर्यातमूल्य न ठेवता कांदा निर्यात सुरु करावी अशी मागणीही कांदा उत्पादक संघटनेनं केलीय.


हळदीच्या दरात घसरण 


हळदीच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पहायला मिळतंय...  हळदीला कमाल 15 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल असून मागील महिन्यात वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीत हळदीला तब्बल 17 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता.