Gondia Crime News : एखाद्या भांडणात मध्यस्थी करणं हे देखील किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय नुकताच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी येथे आला आहे. सिद्धार्थ विद्यालय डवकी येथे संस्थापक आणि एका शिक्षकाचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करायला गेलेल्या सेवानिवृत्त लीपिकाला नाहक आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्या झालेल्या सेवानिवृत्त लिपिकाचं नाव मुकुंद बागडे (वय 60 वर्षे) असे आहे. सिद्धार्थ विद्यालयाच्या संस्थेची सभा काल बुधवार ला आयोजित करण्यात आली होती. संस्थेची सभा संपली आणि सदर शाळेतील शिक्षक आरोपी हिरालाल खोब्रागडे ( वय 52 वर्षे) यांनी अचानक येऊन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी शाब्दिक वाद सुरू केला. यात वादविवाद न करता सामंजस्यांनी प्रश्न मिटावेत या उद्देशाने मृतकाने मध्यस्थी केली मात्र, आरोपी शिक्षकाला राग अनावर झाल्याने त्याने लाकडी दांड्याने मुख्याध्यापकाला मारण्याचा प्रयत्न केला मात्र मधात आलेल्या सेवानिवृत्त लिपिकाच्या डोक्यावर तो लाकडी दांडा लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.


रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सेवानिवृत्त लीपिकाला गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली असून आरोपी शिक्षकाच्या विरोधात भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


 नायब तहसीलदार आणि अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यात अडकले


गोंदियातील सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह नायब तहसीलदार आणि अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यात अडकलेत. त्यांना 1 लाख 82 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय.