नाशिक: सध्या लॉकडाऊनमुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच नाशिकमध्ये रविवारी पहाटे बिबट्याने भरवस्तीत येऊन एका माणसांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडूपमध्ये हरीण 'होम क्वारंटाईन'; पत्रा तुटल्यामुळे थेट कोसळले घरात

प्राथमिक माहितीनुसार, इंदिरानगरच्या राजसारथी सोसायटीत पहाटे साडेपाच वाजता बिबट्या फिरत होता. त्यावेळी सुपडू लक्ष्मण आहेर आणि राजेंद्र जाधव हे सोसायटीच्या आवारात फिरत होते. बिबट्याने त्यांना पाहिल्यानंतर तो वेगाने त्यांच्या दिशेने धावत आला आणि या दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुपडू आहेर आणि राजेंद्र जाधव गंभीर जखमी झाल्याचे समजते. हल्ला केल्यावर बिबट्याने सोसायटीच्या मागील बाजूकडून परिसरातील खोडे मळा परिसरात धूम ठोकली. सध्या वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बिबट्याचा पावलांचा माग काढला जात आहे.



Corona : शेपटीवाल्या प्राण्यांची मुंबईत भरली सभा.....

दरम्यान, हा बिबट्या तिडके कॉलनी आणि मुंबई नाका परिसरात फिरतानाही आढळले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. मात्र, वनविभागाचे अधिकारी याठिकाणी गस्त घालून नागरिकांना दिलास देत आहेत.