पंढरपूर : प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलीओ लसीच्या नावाखाली लहानग्या मुलांच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.  पोलीओ लस लहान बाळाला देताना ड्राॅप सोबत प्लास्टिकचा तुकडा सुध्दा बाळच्या पोटात गेल्याची घटना पंढरपूरमधील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रावर घडली आहे. ड्राॅप पाजणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. आता उपचारासाठी बाळाला दवाखान्यात ऍडमिट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक घटना यवतमाळच्या घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली आहे. पोलीओ लसीच्या नावाखाली लहानग्या मुलांच्या जीवाशी खेळ करण्यात आला. कापसी कोपरी इथं पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना चक्क सॅनिटायझर पाजण्यात आलं आहे.  सॅनिटाझर प्यायलेल्या 12 मुलांची प्रकृती बिघडली असून त्यांना उलट्यांचा सुरु झाल्या आहेत.



चिंतेची बाब म्हणजे ही मुलं अवघी 1 ते 5 या वयोगटातली आहेत. रात्रीच्या रात्री त्यांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.  देवेंदर सिंग यांनी रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत.