जीवघेणी गर्दी; डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल मधून पडून तरुणाचा मृत्यू
लोकल ट्रेनमधीव गर्दीने एका तरुण प्रवाशाचा बळी घेतला आहे. ट्रेनमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Central Railway Accident : लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाते. मात्र, हीच लाईफलाईन रेल्वे प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवाला लागत आहे. लोकलचच्या याच गर्दीमुळे मागील सात दिवसात आता तिसरा बळी गेला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दीमुळे लोकल मधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राहुल अष्टेकर असे मृत प्रवाशाचे नाव आहे. या आधी डोंबिवली स्टेशनवरून लोकलने प्रवास करणाऱ्या अवधेश दुबे, रिया राजगोर यांचा गर्दीने लोकल मधून पडून मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसात तिसरा बळी लोकलच्या गर्दीने घेतला. यातील दोन रेल्वे अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तर तिसऱ्या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू
दोन दिवंसापूर्वी डोंबिवलीत राहणाऱ्या तरुणीचा लोकल मधून प्रवास करताना तोल जाऊन पडून मृत्यू झालाय. रिया राजगोरे ही तरुणी डोंबिवलीहुन लोकलने मुंबईला कामाला निघाली होती. नेहमी प्रमाणे ती डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलध्ये चढली.मात्र लोकलमध्ये गर्दी असल्याने रियाने दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास केला.कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन खाली पडली, त्यात तिचा मृत्यू झाला.या अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भिवंडी बदलापूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनीकागी दिवपांसपूर्वी बदलापूर मधील रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वे प्रवासादरम्यान या प्रवाशाना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते यासंदर्भात प्रवाशांनी म्हात्रे यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला. बदलापूर पर्यंत लोकलच्या फेऱ्या वाढवणे, महिलाना स्पेशल ट्रेन त्याचबरोबर महिलांच्या डब्यांची संख्या वाढवणे, प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी प्रसाधनगृह उभारणे अशा विविध मागण्या प्रवाशांनी केल्या. गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघांमध्ये खासदार असणाऱ्या आणि गेल्या तीन वर्षांपासून केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल पाटील त्यांनी काहीही केलेलं नाही, त्यामुळे खासदार कपिल पाटील यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असा हल्ला राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांनी त्यांच्यावर चढवला