Aajibai Dahihandi Video : दहीहांडी म्हणजे चिल्ल्यापिल्यांच्या काळजाचा विषय... महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी (janmashtami), गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने अनेकांनी सकाळी सकाळी मंदिरात गर्दी केली होती. तर संध्याकाळ होताच लोकांनी रस्त्यावर एकच गर्दी केली आहे. लहान मुलं असो वा म्हातारी माणसं सर्वजण उत्सुक असतात ते दहीहांडी (Dahihandi) पाहण्यासाठी. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये साठी गाठलेल्या एक आज्जीबाई (Aajibai) चक्क थर लावून दहीहांडी फोडताना दिसत आहेत. आजीबाईचा जोश पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्हिडीओमध्ये महिलामंडळ दडीहांडी फोडण्यासाठी रस्त्यावर जमल्या. त्यावेळी महिलांनी 2 थर लावले. गाण्यांच्या तालावर प्रत्येकजण नाचू लागला. सलामी दिल्यानंतर महिलांनी पुन्हा थर लावला अन् त्यावेळी पिवळी साडी घातलेल्या एक आजीबाई वर चढू लागल्या. आजींना पाहून सर्वजण आवाक् झाले. आजीबाई इतर महिलांच्या सहाय्याने वर चढल्या. त्यावेळी त्यांनी बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आजींनी आपल्या डोक्याने दहीहांडी फोडली. आज्जीबांईचा उत्साह पाहण्याजोगा होता. 


पाहा Video



दरम्यान, हा व्हिडीओ मागील वर्षीचा असल्याचं समोर आलंय. पण हौशेला मोल नाही अन् आनंदाला तोड नाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दहिहंडीनिमित्त पुन्हा एकदा तो व्हिडी व्हायरल झालाय. सध्या सोशल मीडियावर दहीहांडीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज्यभरात दहीहांडी मोठ्या प्रमाणात आनंदोस्तव साजरा केला जातोय.


आणखी वाचा - थरावर थर रचण्यात गोविंदांमध्ये चुरस! सेलिब्रिटींकडून गोविंदांना प्रोत्सोहन


कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि दहीहंडीचा सण श्रावण महिन्याच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. हा सण नेहमी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट आणि गुजरात राज्यात प्रामुख्याने मोठ्या उत्सवात हा सण साजरा केला जातो.