Dahi Handi 2023 LIVE: दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये उत्साह, राजकीय नेत्यांची हजेरी

Mumbai Dahi Handi 2023 LIVE: देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा उत्साह दिसून येतो आहे. 

Dahi Handi 2023 LIVE: दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये उत्साह, राजकीय नेत्यांची हजेरी

Janmashtami Dahi Handi 2023 in Mumbai : जन्माष्टमीचा शुभ सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणी दहीहंडीचा उत्साह रंगात आहे. पावसामुळे या उत्साहाला अजून रंगत चढली आहे. 

7 Sep 2023, 18:57 वाजता

मुंबईतील बोरीवली येथील मागाठाणे भागातही दहीहंडीचा उत्साह आहे.. तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आमदार प्रकाश सुर्वे आणि राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने दहीकाला उत्सवाचं आयोजन करण्यात आलेय. या उत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. 

7 Sep 2023, 17:20 वाजता

पुण्यामध्ये देखील दहीहंडीचा उत्साह आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून मान्यता असलेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ आणि पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळ यांनी एकत्र येत दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलेय. 

7 Sep 2023, 14:34 वाजता

Dahihandi Viral Video : ढाक्कुमाकुम! नऊवारी साडी नेसून आजींची कमाल, दहीहंडी फोडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

7 Sep 2023, 14:24 वाजता

Thane Dahi Handi 2023 : ठाण्यातील मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला गौतमी पाटील ही गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी आली आहे. तिने गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी डान्सचा जलवाही दाखविला. 

7 Sep 2023, 13:37 वाजता

Thane Dahi Handi 2023 : ठाण्यातील मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी अभिनेते, फिल्म दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या कामाचं कौतुक केलं. 

7 Sep 2023, 13:18 वाजता

Dadar Dahi Handi Live: मुंबईतील दादर परिसरात आयडिलने आयोजित केलेल्या सेलिब्रिटी दहीहंडी मराठी कलाकारांनी मोठ्या उत्साहात फोडली. ज्येष्ठ मराठी अभिनेता विजय पाटकर सह नवोदित कलाकारांनी उत्साहात दहीहंडी साजरी केली.

7 Sep 2023, 12:58 वाजता

Thane Dahi Handi 2023 : ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकं येत आहेत. शिवप्रतिष्ठान गोविंदा पथकाने सात थर रचत या दहीहंडीला सलामी दिली. आहे. यावर्षी आठ थर कोण लावतं हे पाहण्यासाठी ठाणेकर उत्सुक आहेत. 

7 Sep 2023, 12:33 वाजता

 Mumbai Dahi Handi 2023 LIVE : मुंबई, ठाण्यासह राज्यभरात गोविंदाचा दहीहंडी फोडण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अख्ख राज्य गोविंदामय झालं आहे. पावसासोबत दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात येतो आहे. मागाठाण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

7 Sep 2023, 11:09 वाजता

Vasai Dahi Handi Live : वसई विरार मीरा भाईंदरमध्ये पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 262 सार्वजनिक उत्सव तर एक हजार 216 खाजगी हंड्या आज दिवसभरात फुटणार आहेत. वसई विरारमध्ये सार्वजनिक 180 तर एक हजार 41 खाजगी दहीहंड्या उभारण्यात आल्या आहेत. आकर्षक बक्षिष, मानाची हंडीसह विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. डीजे आणि बँडच्या ठेक्यावर आज मोठ्या उत्सवात वसई विरारमध्ये गोविंदाचा उत्साह द्विगुणीत होणार आहे.सुरक्षेची काळजी घेऊन हा उत्सव पार पाडा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

7 Sep 2023, 10:39 वाजता

Janmashtami Live : साईंच्या शिर्डीमध्ये कृष्णजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला.. साईबाबा समाधी मंदिरात गोकुळ अष्टमीनिमित्त  कृष्ण जन्म कीर्तन पार पडलं.. त्यानंतर 12 वाजता साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा यांच्याहस्ते श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला.. कृष्णजन्मोत्सवानिमित्त मंदिरातील चांदीच्या पालखीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती..