आम्ही करुन दाखवलं, पण गद्दार लोकांनी आपले सरकार पाडले - आदित्य ठाकरे
Aditya Thackeray on Sandipan Bhumre : बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांच्या मदतारसंघात शिवसेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट आव्हान दिले.
पैठण, संभाजीनंगर : Aditya Thackeray on Sandipan Bhumre : बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांच्या मदतारसंघात शिवसेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट आव्हान दिले. यावेळी त्यांनी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना केले. त्याचवेळी आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करुन दाखवलं. पण या गद्दारांनी काय केलं तर आपले चांगले काम करणारे सरकार पाडले, असा घणाघात आदित्य यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला.
इथं आल्यावर ( भुमरे यांच्या मतदार संघात) मला कळलं, आता त्यांचा रस्ता चुकला आहे. पुढं या ठिकाणाहून आपलाच माणूस विधानसभेत जाणार आहे. आपण शहराचे नाव संभाजीनगर करुन दाखवले आहे. कुणीही दंगल केली नाही, आपल्या निर्णयाचे स्वागत केले. आपल्याला कुणासोबत भांडायचे करायचे नाही, या गद्दार लोकांनी आपले सरकार पाडले. आमच्या सरकारने अभिमानस्पद निर्णय घेतले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
(भुमरे) यांना आम्ही शब्द दिला होता, मंत्री बनवण्याचा आम्ही तो पूर्ण केला. यांनी काय केलं? मी स्वतः म्हटल होतं उद्धव साहेबांना, की यांना मंत्री करा, थेट कॅबिनेट मंत्री केले. मला ते नेहमी भेटायचे. मला म्हणायचे फंड मिळत नाही, अहो पण आम्ही कोट्यवधी रुपये दिले यांना, काय कमी दिलं सांगा. यांनी का पाठीत खंजीर खुपसला, असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी उथे उपस्थित केला.
ही गर्दी प्रेम बघून मी भावूक झालो. माझ्या डोळ्यात यांच्या गद्दरीनंतर डोळ्यात पाणी आलं, पण रडायचं नाही लढायच ठरवले. राज्यात दोन लोकांचे मंत्रिमंडळ आहे, बेकायदेशीर सरकार आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.