विशाल करोळे, औरंगाबाद : सोशल माध्यम जसं फेसबुक, ट्वीटर हँक होण्याच्या अनेक तक्रारी आपण पाहिल्या आहेत, मात्र आता तुमच्या खिशात असलेलं आणि विश्वासू वॉट्स अँप सुद्धा हॅक होण्याचा धोका निर्माण झाला आहे, अवघ्या महिन्याभरात अशा 20 तक्रारी औरंगाबादेत दाखल झाल्या आहेत.. अनेकांची यातून मोठी फसवणूक झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅकिंग करून मानसिक, आर्थिक छळवणूक


व्हॉट्सअॅप हे संवादाचं सर्वात सोपं माध्यम... मात्र आता तुमच्या मोबाईलमधल्या व्हॉट्स अॅपवर हॅकर्सची नजर पडलीये... गेल्या काही दिवसांमध्ये अॅप हॅक होण्याच्या तक्रारी वाढीला लागल्या असून  सोशल माध्यमाच्या या जगात खिशातील वॉट्स अप सुरक्षित आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय कारण आता तुमचं What's App सुद्धा हॅक होण्याच्या तक्रारीत वाढ होतांना दिसतं आहे.


औरंगाबादच्या सायबर पोलिसांना महिना भरात असल्या विस तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. औरंगाबादच्या एका तरूणाला याचा फटका बसला आहे, त्याचं वॉट्सअँप हँक करून त्याच्या अनेक मित्रांकडून पैशांची मागणी कऱण्यात आली आहे, तर त्याच्या काही मैत्रीणांना अश्लील व्हिडीओ सुद्ध पाठवण्यात आले, त्यातून त्यानं सायबर पोलिसांकडे धाव घेतली आणि हा प्रकार उघड झाला


कसं होतं हॅकींग?


हॅकर त्याच्या  मोबाईलवर What's App डाऊनलोड करतो त्यात तुमचा नंबर टाकतो आणि तुम्हाला फोन करून वॉट्समधून बोलतोय सांगून आता आलेला ओटीपी सांगा म्हणतो तुम्ही ओटीपी दिला की तुमचं वॉट्स अप अकाऊंट बंद होतं, आणि तुमच्या नंबरचं वॉट्स अपं हॅकर्स वापरू लागतो.. आणि त्यातून मित्रांना नातेवाईकांना पैशांची मागणी होते, काही वेळस लॉटरी लागल्याच्या लिंक पाठवूनही फसवतात, तर काहींना अश्लील मँसेजेसही पाठवल्या जातात..


असल्या तक्रारी वाढत चालल्याचं पोलीस सांगत आहेत, त्यामुळं सगळ्यांनाच सावधानतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


धक्कादायक म्हणजे ओटीपी नसेल तर वॉट्स अॅप हॅक करण्यासाठी कॉल डायवरर्टींग चा सुद्धा वापर केला जातो,  यात बंद करूण ठेवलेल्या वॉट्सअपचा वापर केल्या जातो, रात्रीतून तुम्ही वॉट्स बंद केल्यावर हा  फंडा वापरला जातो. 


कॉल डायव्हर्टचा पर्यायात ही ऑनलाईन छेडछाड होत आहे. त्यामुळं आपला मोबाईल ही आपली संपत्ती आहे, असं समजत कुणाला काहीही माहिती देवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यामुळं आता फेसबुक, ट्वीटर नंतर तुमचं वॉट्स अपंही धोक्यात आलंय, याची जाणीव ठेवा आणि कुठलाही पासवर्ड, ओटीपी कुणासोबतच शेअर करू नका, वॉट्स अँप सुद्ध सावधानतेने वापरा तरच तुमची फसवणूक टळू शकेल, कारण तुम्हाला लुटण्यासाठी भामट्यांची एक मोठी फौज तयार आहे याची जाणीव असंणं महत्वाचं आहे.