विदेश पर्यटकांचे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकांचे आवडते शहर; मुंबई फिरल्यानंतर इथं आवर्जन भेट देतात
मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय शहर आहे. विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. महाराष्ट्रात आणखी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे देखील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
Top 10 Tourist Places Near Pune : मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय शहर आहे. अनेक विदेशी पर्यटक मुंबईत फिरायला येतात. मात्र, विदेश पर्यटकांचे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकांचे आवडते शहर कोणते आहे ते माहित आहे का? हे लोकप्रिय शहर आहे पुणे. देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सफर केल्यावर विदेश पर्यटक पुणे शहराला आवर्जन भेट देतात. पुण्यात अनेक ऐतिहासीक वास्तू आहेत.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण; सातपुडा पर्वतात रांगेतील छुपं पठार, खास सुर्योदय पाहण्यासाठी येतात पर्यटक
पुणे शहर झापाट्याने विकसीत होत आहे. यामुळे पुणे शहर हे मुंबई शहराशी बरोबरी करत आहे. शिक्षणाचे माहरेघर आणि सांस्कृतित शहर अशी पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पुण्यात अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत. विदेशी पर्यटक पुण्यातील या लोकप्रिय पर्टनस्थळांना आवर्जून भेट देतात.
लाल महल (Lal Mahal)
लाल महल ही पुण्यातील अत्यंत महत्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. पुणे शहराच्या मध्यभागी हा लाल महल आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले असे अभ्यासक सांगतात. याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले. त्यानंतर स्वराज्यावर कब्जा करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात कापली होती असे देखील सांगितले जाते. पुणे महानगरपालिकेने लाल महलची पुर्नबांधणी केली आहे.
शनिवार वाडा (Shanivar Wada)
शनिवार वाडा हे पुण्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. शनिवार वाडा ही पेशवेकालीन ऐतिहासिक वास्तू आहे. या ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली हा राजवाडा बांधला होता. हा वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा. मात्र, इंग्रजांनी या वाड्यावर कब्जा मिळवला आमि हा वाडा जाळून टाकला. आता फक्त वाड्याचा पाया आणि तटबंदीचा भाग अस्तित्वात आहे.
आगा खान पॅलेस (Aga Khan Palace)
आगा खान पॅलेस इटालियन बनावटीचा आहे. गांधी मेमोरिअल सोसायटीचा हा एक भाग आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी,महादेव भाई यांच्यासाठी तुरूंग म्हणून या पॅलेसचा उपयोग करण्यात आला होता. महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारकदेखील आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Dagadusheth Halwai Ganapati Temple)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई एके काळचे पुण्यातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांनी पुण्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची लोकप्रियता वाढली. गणेशोत्सवामध्ये या गणपतीला मानाचे स्थान आहे.
सिंहगड (Sinhgad)
सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द आणि लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून 35 ते 40 कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे.
सारसबाग (Saras Baug)
स्वारगेट येथील सारसबाग हे देखील पुण्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. हिरवीगार झाडे आणि रंगीबेरंगी फुलांनी सारसबाग बहरलेली आहे. सासरबागेत एक छोटे तळे असून त्यामध्ये गणपतीचे मंदिर आहे. हा गणपती तळ्यातला गणपती म्हणूनही ओळखला जातो.
तुळशीबाग (Tulsi Baug)
पुण्यात गेल्यावर जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर पुण्यातील तुळशीबागेला जरूर भेट द्या. तुळशीबागेत तुम्हाला काय मिळेल यापेक्षा काय मिळणार नाही हेच विचारावं लागेल. कारण तुळशीबागेत तुम्हाला सौंदर्यसाधने, देवदेवतांच्या मुर्ती, भांडी-कुंडी, खेळणी, भेटवस्तू अशा सर्वच गोष्टींमध्ये निरनिराळे प्रकार मिळू शकतात.
महात्मा फुले संग्रहालय (Mahatma Phule Museum)
पुण्यात घोळे रोडवर शिवाजी नगर येथे महात्मा फुले संग्रहालय आहे. हे महात्मा फुलेंचे निवासस्थान होते. पूर्वी हे संग्रहालयाला ‘रे म्युझियम’ नावाने ओळखले जायचे. या संग्रहालयात शेती, शेतीची साधने, हस्तकला, दागदागिने, कोरिव काम, पुतळे अशा जुन्या वस्तूंचे जतन करण्याक आले आहे.
विश्रामबाग वाडा (Vishrambaug Wada)
विश्रामबाग वाडा हे देखील पुण्यातील लोकप्रिय स्थळ आहे. विश्रामबाग हे पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव यांनी विश्रामबागेत राहणं पसंत केले. पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे.
पाताळेश्वर लेणी आणि मंदिर (Pataleshwar Temple And Caves)
पाताळेश्वर लेणी शिवजीनगर परिसरात आहे. या लेण्या जमीनीखाली खोदलेल्या आहेत. येथेच पाताळेश्वर शिव मंदिर आहे. या मंदिरामध्ये शिवालय राजवटीच्या खुणा दर्शवणाऱ्या सुंदर लेण्या आहेत.