Sharad Pawar News:  रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत. यावेळी आमदार किरण लहामटेला खाली बसवा आणि अमित भांगरेच्या मागे शक्ती उभं करण्याचं आव्हान शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी जनतेला केले आहे. अमित आणि त्याच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या. तुमची मदत असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला (आमदार किरण लहामटे) मी निवडून दिलं. मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल. काही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही असे भाषण केले. मुंबईत गेला भलतीकडे जाऊन बसला. कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत बसवायची वेळ आलीय. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही..


निवडणूक आयोगाने बिगुल आणि पिपाणी चिन्ह गोठवलंय


निवडणूक आयोगाने बिगुल आणि पिपाणी चिन्ह गोठवलंय...शरद पवारांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय...निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे पवार गटाला दिलासा मिळालाय...अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी चिन्ह गोठवण्यात आलंय...पिपाणी चिन्हामुळे पवार गटाला लोकसभेत फटका बसला होता...शिरूर, माढा, बीड मतदारसंघात पिपाणी या चिन्हाला जास्त मतं पडली होती...तसंच साता-यातील जागा ही पिपाणी चिन्हामुळे पडली होती असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता...त्यामुळे विधानसभेसाठी पवार गटाला मोठा दिलासा मिळणाराय...


मविआतील मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून राऊतांनी पुन्हा एकदा सूचक विधान केलंय...मुख्यमंत्रिपदाबाबत मविआचा चेहरा कोण हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे असं विधान राऊतांनी केल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय...तर मुंबई, कोकण हा शिवसेनेचा गड आहे...तर काँग्रेसचा विदर्भात प्रभाव असून, राष्ट्रवादी पवार गटाचा पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव आहे...त्यामुळे पक्षाच्या प्रभावानुसार मविआत जागावाटप होईल अशी माहिती राऊतांनी दिलीय...


भाजपकडून अजित पवार गटाची तक्रार केल्यावरून सुप्रिया सुळेंनी टीका केलीय...मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती आहे...मात्र, हा त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणत भाजपला टोला लगावलाय... गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बघता विधानसभेच्या तिन्ही जागा काँग्रेसकडे येतील. अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी दिलीये.. काँग्रेसच्या या जिल्ह्यातील संघटना सत्यस्थितीचा बैठकीत आढावा घेण्यात आला. याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर केला जाणार आहे.


अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. नांदेड जिल्हयातील भोकर मतदारसंघात त्या गाव भेटीसाठी गेल्या होत्या. तिथे कामनगावमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.