नगरच्या दाम्पत्य मारहाणीला धक्कादायक वळण, पैशांसाठी बनवला व्हिडिओ
अहमदनगरमधल्या दाम्पत्याचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे.
अहमदनगर : अहमदनगरमधल्या दाम्पत्याचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. अर्धनग्न करून मारहाण केल्याचा राज्यभर व्हायरल झालेला व्हिडिओ हा आरोपींकडून पैसे उकळण्यासाठी तयार करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. २०१६ साली या महिलेनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यातले आरोपी जामिनावर होते. त्यांच्यावर दबाव आणून पैसे उकळण्यासाठी काही जणांना हाताशी धरून हा व्हिडिओ बनवल्याचं उघड झालं आहे.
याप्रकरणी ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून माहिती घेतली असता हा व्हिडीओ त्यांनी तयार केल्याची कबुली दिली. या प्रकरणात तपासासाठी अहमदनगर पोलिसांनी वरिष्ठ पातळीवरची पथकं तयार करून छडा लावला. दाम्पत्यासह तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आता गुन्हा नोंदवण्यात आलाय.