जळगाव :  एकनाथ खडसेंनी कानात काय सांगितलं, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, एकनाथ खडसे यांनी कानात काय सांगितलं, ते योग्य वेळी सांगेन, निदान यामुळे का असेना, भाजपवाल्यांना रात्रभर झोप लागणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.


मी अजितदादांच्या कानात सांगितलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे लोकांच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही, माझ्या मनात जे आहे, ती मी अजितदादांच्या कानात सांगितलं, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं, त्यावर अजितदादांनी हे मत व्यक्त केलं आहे.


खडसे राष्ट्रवादीत जातील, चर्चेला पूर्णविराम


राष्ट्रवादीचे एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार सतीष पाटील यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम जळगावात पार पडला. या कार्यक्रमासाठी भाजपचे एकनाथ खडसे उपस्थित होते, यानंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत की काय? अशी चर्चा जिल्ह्यातील लोकांमध्ये सुरू होती.