NCP MLA Disqualification Case Latest News : राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीचा निकालाबबात मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार गट हाच मुळ राष्ट्रवादी पक्ष आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले. शिवसेनेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल देत चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव त्यांना दिले. मात्र, आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाणार का? याचीच चर्चा रंगली होती. नार्वेकर यांनी अजित पवार गटाच्याबाजूने निर्णय दिला आहे. अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची  लढाई देखील निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्षांपर्यंत जाऊन पोहोचली. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबतचा निर्णय दिला. राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले आणि विविध मुद्दे मांडले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या  सर्व समित्यांची बाजूही समजून घेतल्या. कार्यकारणी आणि अध्यक्षांचे अधिकार याचे मुद्दे मांडले. कार्यकराणी समिती सर्वात मोठी  आहे.  दोन्ही गटांना म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली होती.  30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले.  नेतृत्व रचनेसाठी पक्षघटना लक्षात घेतली गेली.


 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. निवडणूक आयोगापाठोपाठ वि.अध्यक्षांचा निकाल दिला आहे.  अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचे नार्वेकर म्हणाले. हा निकाल  राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार असून अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला.  शरद पवार गटाची मागणी नार्वेकर यांनी फेटाळली आहे. 


राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना बहाल


राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना बहाल करण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला. तब्बल सहा महिने या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. अखेर  6 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला.