Ajit Pawar NCP Issue Rupali Chakankar React: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून रुपाली चाकणकरांना उमेदवारी देण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. चाकणकरांची वर्णी लागणार असल्याच्या वृत्तावरुन पक्षातील पुण्याच्या महिला नेता रुपाली पाटील-ठोंबरेंनी आक्षेप नोंदवत एक नेता एक पद भूमिकेची आठवण करुन देत इतर महिलांचा विचार करण्याची मागणी केली आहे. एकाच महिलेली किती पदं देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या आक्षेपावर आता रुपाली चाकणकरांनी उत्तर दिलं आहे.


बातम्या पेरल्या?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये माझ्या नावाची चर्चा असल्याचं मला तुमच्याकडून (प्रसारमाध्यमांकडून) समजलं आहे. पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्या पुढचा तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आमच्या प्रवक्त्या राजलक्ष्मी भोसले देतील," असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. पत्रकारांनी, "तुम्हीच त्या बातम्या पेरल्याचा आरोप होत आहे," असं म्हणत प्रश्न विचारला असता रुपाली चाकणकरांनी, "मी सांगितलं ना की आमच्या प्रवक्त्या आणि ज्येष्ठ नेत्या उत्तर देतील. मला वाटत नाही की हे काही उत्तर देण्यासारखे प्रश्न आहेत," असं म्हटलं.  


सगळी पदं तुम्हालाच का? यावर काय बोलल्या?


"सगळी पदं तुम्हालाच का असा आक्षेप आहे," असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना, "मी तेच सांगितलं, की हे प्रश्न मला तुमच्याकडून समजत आहेत. मला याबद्दल काहीच माहिती नाही. आमच्या महिलांची बैठक सुरु आहे. त्यामुळे मी हे काही पाहिलेलं नाही. मी पाहते, माहिती घेते आणि मग उत्तर देते," असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.


माझ्यापेक्षा या प्रश्नांची....


"एक व्यक्ती एक पद असणं अपेक्षित आहे. तुमच्याकडे दोन पदं आहेत," असं रुपाली पाटील-ठोंबरेंचं म्हणणं असल्याचं सांगितल्यावर रुपाली चाकणकरांनी, "हा सगळा पक्षाचा विषय आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय दादा, आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल निर्णय घेतली. माझ्यापेक्षा या प्रश्नांची उत्तर त्यांच्या माध्यमातून आणि कार्यातून देतील," असं उत्तर दिलं. 


यंदा उमेदवारी मागणार असे संकेत


"2019 ना मी उमेदवारी मागितली होती. ज्या दिवशी मुलाखत होती त्यावेळेस माझ्याबरोबर 7 उमेदवार होते. मी ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला प्रदेशाध्यक्ष पद मिळालेलं. म्हणून मला उमेदवारी मिळाली नाही. मी पाच वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. मी तेव्हा ठरवलं होतं 2019 उमेदवारी मिळणार नाही तर 2024 ला उमेदवारी मागू. त्यानुसार आम्ही सर्व खडकवासला मतदारसंघातील पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांनी 15-20 दिवसांपूर्वी दादांची भेट घेतली. खडकवासला अध्यक्षांच्या माध्यमातून एक निवदेन देत खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि पक्षातून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी दादांकडे केली आहे. याबाबत दादा आणि इतर जेष्ठ नेते बसून चर्चा करतील. त्यानंतर निर्णय आम्हाला कळवतील," असं खडकवासल्यामधील उमेदवारीसंदर्भात रुपाली चाकणकरांनी सांगितलं.