जळगाव : ST employees strike : एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा थेट इशारा संपकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.(Ajit Pawar's warning ST employees ) दरम्यान, एसटी महामंडळाच्या बैठकीत जे संपकरी कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, त्यांच्यावर मेस्मा लावण्याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे संपकऱ्यांविरोधात कडक पावलं उचलण्याचा इशारा पुन्हा एकदा देण्यात आला आहे. काल काही कर्मचाऱ्यांना बडर्तफ करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात भेट दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह आदी उपस्थित होते. त्याआधी त्यांनी हा इशारा दिला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, एसटी महामंडळाचे कर्मचारी यांना मानधन कमी होते. त्यात 41 टक्के वाढ केलेली आहे. शेवटी कर्मचारी आणि प्रवासी आपलेच आहे. काही प्रश्न चर्चेने सोडवले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. आता शासनाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. शासनाला कटू निर्णय घेण्यास भाग पाडू नये, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



काही कर्मचारी कामावर नियमित हजर होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. तुटेपर्यंत ताणल्यास नुकसान होईल. कर्मचारी संघटनांनी सामंजस्याच्या भूमिकेने चर्चेतून मार्ग काढता येतो. तशी शासनाची भूमिका आहे. तसेच दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होणार आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.