Ajit Pawar On Ramdev baba: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या मिश्किल वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जातात. रुबाबदार आणि रोखठोक भाषणशैली ही अजित पवारांची खासियत... आज अहमदनगर (Ahmednagar News) येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी सभा दणाणून ठेवली. त्याला कारण ठरलं रामदेव बाबा... (Ajit Pawar told the story of Ramdev baba and the whole meeting burst into laughter Ahmednagar News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामदेव बाबाचा ऐकलं आणि डोक्याचे केसं गेले, असा खळबळ ज्यांना खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. अहमदनगर येथील अंबालिका शुगर या त्यांच्या खाजगी साखर कारखान्यावर घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी अजित पवार आले होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना बुवा बाबांचं ऐकू नका साधू संतांचा ऐका असं सांगत रामदेव बाबाचा (Ramdev Baba) ऐकलं आणि डोक्याचे केस गेले असं सांगत असतानाच तुम्ही नखांवर नख घासू नका, असा सल्ला देखील अजितदादांनी दिला आहे.


नेमकं काय म्हणाले Ajit Pawar? 


Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा झटका; पोलिसांत गुन्हा दाखल


रामदेव बाबानं सांगितलं म्हणून मी नखाला नखं घासली. मी केलं पण माझी सर्व केसं गेली. नवीन केस यायचं तर नावाच नाही. या बुवा लोकांचं काही ऐकू नका, सांधू संतांचं ऐका, महापुरुषांचं ऐका.. बाबानो, नखाला नख घासून तिसरंच काहीतरी व्हायचंय. तो डॉक्टर म्हणेल, कशाला बाबा नादी लागला. त्यात पुन्हा डॉक्टरांना खर्च आला, असं म्हणताच अनेकांना हसू आवरलं नाही.


आणखी वाचा - जितेंद्र आव्हाडांची जीभ कापून आणणाऱ्यास BJP कडून 10 लाखांचं बक्षीस


दरम्यान, राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना करताना मुस्लीम धर्माबद्दल (Hindu Muslim) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर संध्याकाळी गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर रामदेव बाबांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.