मुंबई : कोरोनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. चारवेळा संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्यात आलं. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात सलून बंद करण्यात आले ते अद्याप उघडलेले नाहीत. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पती आमदार रवी राणा यांचे घरीच केस कापल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार नवीनत राणा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना, 'आत्मनिर्भर होण्याचा अनोखा प्रयत्न' म्हणत ही पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी आपापल्या घरीच केस कापले आहेत. मात्र नवीनत राणा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


आत्मनिर्भर बननेका अनोखा प्रयास, लॉकडाउन में सांसद पत्नी ने काटे विधायक पति के बाल।

Posted by Navneet Ravi Rana on Friday, May 29, 2020

शेअर केलेल्या या व्हिडिओत नवनीत राणा म्हणतात,'मी माझ्या नवऱ्याला बऱ्याच वेळा सांगितले की, एखाद्या बारबरला बोलवा आणि केस कापून घ्या. मात्र वारंवार सांगूनही ते ऐकत नव्हते आणि तसेच अनेक बैठकांना जात होते. ते मला योग्य न वाटल्याने मी आज त्यांचे केस कापणार आहे.'


सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओला भरपूर लोकांनी लाईक केलं असून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.