कसारा स्टेशनवर मोटारमनच्या दरवाजा उघडून आत शिरला आणि म्हणाला... लोकल ट्रेन तेरा भाई चलाएगा
स्थानकात उभ्या असलेल्या लोकल रेल्वेमध्ये रील बनवणं तरुणांना चांगलंच महागात पडलंय. पोलिसांनी ताब्यात घेऊन तरुणांची कानउघाडणी केलीय.
Kasara Station Reel Star : कसारा स्थानकात उभ्या असलेल्या लोकलमध्ये काही मुलांनी रिल बनवली. मोटारमनचा दरवाजा उघडून तरुण आत शिरला.. तुम्हारा भाई लोकला चलाएगा म्हणत अतिउत्साही तरुण मोटारमनच्या खूर्चीवरही बसला. तिथेच बसून रिलही शूट केलं... 20 वर्षीय राजा येरवाल ह्यानं आपला सहकारी रितेश जाधवसोबत ही रिल इन्स्टाग्रामवर अपलोड केली....
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील एकमेव फळ... जे कच्चं असल्यावर स्त्रीलिंगी असते आणि पिकल्यावर पुल्लिंगी होते
सध्या सोशल मीडियाचं फॅड वाढलंय. रिल्स बनवण्याच्या नादात जीव धोक्यात घालणारे अनेक महाभागही सोशल मीडियावर ट्रेंडिंगला असतात. सोशल मीडियावरील लोकप्रियतेसाठी हवं ते करताना अनेकांना नियमांचंही भान राहत नाही.
ही रील व्हायरल होऊन रेल्वे सुरक्षा बलापर्यंत पोहोचली...पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यमातून रेल्वे कायद्यानुसार रिल करण-या राजा येरवाल आणि रितेश जाधवला ताब्यात घेतलं.. पोलिसांनी तरुणांची कानउघाडणी करत महत्त्वाचं आवाहन केलंय.
आभासी जगातील सवंग लोकप्रियतेसाठी मुलं-मुली वाट्टेल ते करतात. प्रसंगी जीवही धोक्यात टाकायला मागे-पुढे पाहत नाहीत. सोशल मीडियाला दोन बाजू आहेत. त्यामुळं सोशल मीडियाचा चांगला वापर करून सदुपयोग करणं अत्यंत महत्त्वाचंय.
रील बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट
पुण्यात रील बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट करणा-या तरुण तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी करुन पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिलं. तसंच या प्रकरणात आणखी काही व्हिडिओ मिळाले आहेत. ते आणखीनच गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. तसंच अशा प्रकारचे जीवघेणे स्टंट करताना, सामाजिक भान बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी केल्यात.
सोलापुरातील एका तरुणाने रिल्स बनवताना एका कुत्र्याला चक्क तलावात ढकलंय... या तरुणाचा हा कारनामा सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामुळे प्राणी मित्रांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय.तर या तरुणाला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी प्राणी मित्रांकडून करण्यात आलीय.
हे देखील वाचा... महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात श्रीमंत गाव! इथं राहणाारा प्रत्येकजण करोडपती
रील काढण्याच्या नादात नाशिकच्या येवल्यातील दोघा तरुणांचा अपघात झालाय... शाहरुख शहा आणि त्याचा मित्र दोघेही कोपरगावला जाताना एकाने मोटरसायकल चालवत असताना रील शूट करण्यास सुरुवात केली मात्र अचानक स्पीड ब्रेकरवर गाडिवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही खाली पडले. दोघेही जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी