Manda Mhatre Vs Ganesh Naik :  नवी मुंबईत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि भाजप आमदार संदीप नाईक त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलंय. मंदा म्हात्रे या बेलापूर मतदार संघाच्या आमदार आहेत. असे असताना बेलापूरमधून गणेश नाईक यांचे पुत्र आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे निवडणूक लढवण्याचा तयारीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याला परिचीत आहे. नेरुळ येथील कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी  संदीप नाईक याच्यांवर जोरदार टीका केली. सध्या सगळ्यांना आमदार व्हायचं आहे. माझ्या नादाला लागलं तर त्याचा मी नादखुळा केल्याशिवाय राहणार नसल्याचा दमच मंदा म्हात्रे यांनी दिलाय...  यावर विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही आमचे काम करत राहू अशी प्रतिक्रिया संदीप नाईक यांनी दिली...


मंदा म्हात्रे या बेलापूर मतदार संघाच्या विद्यमान आमदार आहेत. असं असताना बेलापूरमधून गणेश नाईक यांचे पुत्र आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे निवडणूक लढवण्याचा तयारीत आहेत.. त्यांनी मतदारसंघात तशी तयारीही सुरू केलीय. त्यावर मंदा म्हात्रे संतापल्या. माझ्या नादाला लागाल तर नादखुळा केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच त्यांनी दिलाय.  तर विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही आमचे काम करत राहू अशी प्रतिक्रिया संदीप नाईक यांनी व्यक्त केली. मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचा राजकीय संघर्ष आजचा नाहीय.. त्यांच्या वादाची अनेक कारणं आहेत.


मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक पारंपरिक विरोधक 


गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे नवी मुंबईतील पारंपरिक विरोधक आहेत.  2014 मध्ये मंदा म्हात्रेंनी बेलापूरमधून गणेश नाईकांनाचा पराभव केला. आधी राष्ट्रवादीत आणि आता भाजपात आल्यानंतरही दोघांमधील वाद संपत नाही.  10 वर्षापूर्वी  दिवाळेतील जेट्टीच्या उद्घाटनावरून दोघांमध्ये मोठा वाद आहे. बेलापूरमध्ये रुग्णालयाला जमीन देण्यावरून खटके उडाले होते.  मंदा म्हात्रेंनी सुरू केलेला गावाचा सिटी सर्व्हे नाईक समर्थकांनी बंद पाडला.  आता आमदारकीवरून संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात संघर्ष आहे. 


विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलीय. त्यामुळे आतापासूनच पुन्हा खटके उडायला सुरूवात झालीय. त्यामुळं तिकीट वाटप करताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मात्र द्राविडी प्राणायाम करावा लागणार यात शंका नाही..