सांगली : गृहराज्यमंत्री दीपक केसकर यांनी सांगलीत अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी कोथळे कुटुंब प्रचंड आक्रमक झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएसआय युवराज कामटेसह आणखी काही वरिष्ठ अधिकारी यात असून त्यांच्यावर कारवाई होऊन न्याय न मिळाल्यास संपूर्ण कुटुंब पोसील स्टेशनसमोर आत्मदहन करेल असा इशारा अनिकेतची पत्नी आणि भावानं गृहराज्यमंत्र्यांना दिला. दरम्यान मारहाण आणि खून प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करु असं आश्वासन त्यांनी कोथळे कुटुंबाला दिलं. पीएसआय कामटेबाबत वरिष्ठांनी दुर्लक्ष केलं असेल तर यासंदर्भात चौकशी केली जाईल तसंच प्रशासनातील त्रुटींबाबत स्वतंत्र अधिकारी नेमून पूर्ण चौकशी केली जाईल असंही ते म्हणाले.


दरम्यान,  पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमूखी पडलेल्या अनिकेथ कोथळे यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांत्वन केले. या भेटीवेळी अनिकेतच्या कुटूंबियांनी विशेषत: त्यांच्या चिमूकलीने विचारलेल्या प्रश्नांमुळे पोलिसांवर तोंड लवविण्याची वेळ आली. तर, उपस्थितांचेही डोळे पाणावले. मम्मी पप्पाला मारुन आले का....?, असा हा आर्त सवाल चिमूकलीने विचारताच पोलिसांवर तोंड लवविण्याची वेळ आली. या प्रश्नाचे उत्तर ना पोलिसांकडे होते. ना उपस्थितांकडे.