...म्हणून आपल्याच पक्षाच्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी
आपलं वय झाल्याचा उल्लेख करणाऱ्यांचा शरद पवारांनी चांगलाच मिश्कील समाचार घेतला.
अकोला : वयाच्या अठ्ठ्याहत्तरीतही शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर असतात. तरुणांनाही लाजवेल इतकी शिस्त, एनर्जी त्यांच्याकडे आहे. असे असतानाही त्यांच्या वयावरून चर्चा केली जाते. याला पवारही आपल्या मिश्किल स्वभावाने उत्तर देतात. असाच एक प्रसंग अकोल्यातील सभेदरम्यान घडला. आपलं वय झाल्याचा उल्लेख करणाऱ्यांचा शरद पवारांनी चांगलाच मिश्कील समाचार घेतला.
'अभी तो मै जवान हूँ, म्हणत पवारांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. वयाचा उल्लेख करणाऱ्या आपल्या पक्षाच्या नेत्यांची फिरकी घेतांना पवार म्हणाले की, माझ्या वयाबद्दल बोलू नका. मी तूमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, हे लक्षात ठेवा. विरोधकांना घरी पाठवूनच आपण घरी जाणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
लोकसभेतील भाजपचा विजय संरक्षण मुद्द्याला भावनिक मुद्दा केल्याने झाल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, आपण शेतकर्यांच्या पिकाला भाव देत असतांना भाजपवाले आपल्याला महागाईचं कारण देत विरोध करायचे. त्यावेळी मी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कांद्याच्या, कवडांच्या माळांकडे दुर्लक्ष केल्याचा टोला पवारांनी लगावला आहे. शरद पवारांचं आजचे भाषण शेतकऱ्यांवर केंद्रीत होते.
शरद पवार यांनी पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा दौरा केला. आता दुसऱ्या टप्प्यात ते उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. सततच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकण्यासाठी पवारांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पवार यांनी काही भागात अनेक भागात सभा घेतल्या. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पवार सरकारवर तोफ डागण्यासाठी सज्ज झालेत.
दरम्यान, शरद पवारांनी काल 'झी २४ तास'शी बोलना स्पष्ट केले. राज्यात बदलाचे वारे दिसून येत आहे. तरुण पुढे येत आहे. मी तरुणांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि भविष्यात तरुणांची नवी फळी उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्याचा दौरा करणार आहे.