Nagpur News : अनेक प्राणी प्रेमी मोठ्या हौसेने कुत्रे पाळतात. मात्र, हेच पाळीव कुत्रे त्यांच्या मालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. ज्यांना जीव लावला तेच जीवावर उठले. पाळीव कुत्र्यांनीच मालकाचे लचके  तोडले आहेत. भंडारा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत कुत्र्यांचा मालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाळीव कुत्र्यांनीच मालकाचे लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. तुमसर तालुक्यातील कर्कापुर येथिल विलास पडोळे हे शेतकरी आहेत. शेतीत राखण करण्यासाठी त्यांनी दोन कुत्रे पाळले होते. पण तेच कुत्रे त्यांच्या जीवावर बेतले. पाळीव कुत्राच मालकाच्या जीवावर उठले दोन्हीं कुत्र्यांनी आक्रमकपणे  विलास यांचे लचके तोडत होतें. गावकऱ्यांनी कुत्र्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत कुत्र्यांनी विलास पडोळे यांना गंभीर जखमी केले होते. ही घटना 31 डिसेंबरची असून आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. तर, विलास पडोळे यांच्यावर सद्या नागपूर येथे उपचार सुरू आहे. त्यामुळे कुत्रे पळताना जरा सांभाळून असचं म्हणावं लागेल.


पाळीव कुत्र्यानं मालकिणीचा जीव वाचवला


पुण्यात पाळीव कुत्र्यानं मालकिणीचा जीव वाचवलाय. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्या निरगडसर इथल्या घरी ही घटना घडलीय. या सापाला पाहून रामदास यांच्या पत्नी चंदा वळसे पाटील घाबरल्या आणि अंगणात पडल्या.. मात्र त्यांच्या कुत्र्यानं नागावर हल्ला करत त्याला मालकिणीपासून दूर ठेवलं.. आणि गेटबाहेर हुसकावून लावलं.. कुत्रा आणि नागाच्या संघर्षाचा हा व्हिडियो सीसीटीव्हीत चित्रीत झालाय. 


कुत्रा चावल्यानं महिलेची पोलिसात तक्रार 


पुण्याच्या हडपसर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत पाळीव कुत्रा चावल्यानं एका महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार या कुत्र्याच्या मालका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्ररदार राशी अभिषेक सक्सेना सोसायटीच्या लिफ्ट मधून खाली येत होत्या. यावेळी मनीषा सिंग यांची मुलगी कुत्रा लिफ्ट मधून घेऊन जात होत्या. मात्र कुत्रा कोणाला चावू नये याची दक्षता न घेतल्याचा आरोप राशी यांनी केला.