लातूर : लातूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर अख्तर मिस्त्री यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ज्यात त्यांच्या डोक्याला ८ ते १० टाके पडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्यावर लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत दोघा जणांना अटक केली आहे. तर एक जण अल्पवयीन असल्यामुळे त्याला ताब्यात घेतलं आहे.


या घटनेनंतर शहरातील अंबाजोगाई रोडवर रात्री एक मोटार सायकलही जाळण्यात आली होती. सध्या जुन्या गाव भागात तणावपूर्ण शांतता असून पोलीस या सर्व घटनेवर नजर ठेवून आहेत. 


अख्तर मिस्त्री हे काँग्रेसकडून महापौर होते. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर महापौर पदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर ते भाजप मध्ये दाखल झाले होते.