पुणे : Crime News : धक्कादायक बातमी पुण्यातून. तरुणांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरुन खुन्नस निर्माण झाली. त्यानंतर तरुणांमध्ये बाचाबाची होत जोरदार हाणामारीत झाली. यानंतर दुसऱ्या गटाला धडा शिकविण्यासाठी काहींनी हातात काठ्या आणि कोयता घेत मंडईत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावातील मंडईमध्ये हातात कोयते घेत दहशत निर्माण करण्याचा तरुणांनी प्रयत्न केला. कोयते फिरवत दहशत निर्माण करुन फरार झालेल्या आरोपींना हवेली पोलीसांनी डोणजे फाटा परिसरातून अटक केली आहे. 


गौरव राकेश चव्हाण (21), विशाल सिद्धु बनसोडे (23), परशुराम चिलाप्पा सोनकांबळे (21), सौरभ कोंडीबा कांबळे (20) (सर्व राहणार लमाणवस्ती, खडकवासला), गणेश अशोक शेळके (28, रा. तळजाई वसाहत मुळ रा. डोणजे ता. हवेली) आणि विलास कोंडीबा मरगळे (20, रा. आडमाळ ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकवासला येथील तरुणांमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या खुन्नसने बाचाबाची झाली होती. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर दुसऱ्या गटाने रात्री पुन्हा खडकवासला गावात येऊन कोयते आणि काठ्या घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.