Aurangabad Crime: औरंगाबादमध्ये पोलिस अधिकाऱ्यानेच महिलेचा विनयभंग (Police ACP Molested Women) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद पोलिस दलामधील गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे (Vishal Dhume) यांनी दारुच्या नशेत एका महिलेशी अश्लील चाळे (Obscenes Act) केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ढुमे यांनी या महिलेच्या घरात प्रवेश करत घरातील शौचालय वापरण्याची मागणी करताना या महिलेच्या पतीबरोबरच दीर आणि सासूलाही शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली. हे प्रकरण समोर आल्यानं ढुमेंची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास हा सारा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी ढुमेंविरोधात विनयभंगासहीत बळजबरीने घरात घुसल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या मुलीबरोबर एका रेस्तरॉमध्ये डिनरसाठी गेली होती. त्यावेळी ढुमे त्यांच्या मित्रांसहीत याच रेस्तराँमध्ये आले. पीडिता आणि ढुमे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. या महिलेने ढुमेंकडे पोलिस आयुक्तालयासमोर सोडण्याची विनंती केली.


रात्री पावणेदोन वाजता हे सर्वजण एकत्र घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा ढुमेंनी या महिलेला लिफ्ट दिली. पीडित महिला तिच्या मुलीसहीत पुढल्या सीटवर बसली होती. ढुमे या महिलेच्या मागच्या सीटवरच बसले होते. गा़डी सुरु झाल्यानंतर काही वेळातच ढुमेंनी या महिलेबरोबर अश्लील चाळे सुरु केले. ढुमे एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते पीडितेच्या घरात बळजबरीने घुसले. त्यानंतर त्यांनी या पीडितेच्या बेडरुममधील शौचालय वापरण्याचा आग्रह करत वाद घातला. ढुमेंनी या महिलेच्या सासूबरोबरच पतीलाही शिवीगाळ केली. पोलिस अधिकाऱ्याकडून अशी वागणूक मिळत असल्याने पीडितेच्या पतीने पोलिसांना बोलावलं. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि ढुमेंना घेऊन गेले.


पोलीस आयुक्त डॉ. गुप्तांनी ढुमेंची तडकाफडकी बदली केली. नियंत्रण कक्षात ढुमेंची बदली करण्यात आली असून अङवाल गृह मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. ढुमेंना निलंबित करायचं की नाही यासंदर्भातील निर्ण गृह मंत्रालयातूनच घेताल जाईल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.