Aurangabad Murder Case : एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या, 24 तासात आरोपी अटकेत
आरोपीने मुलीला फरफटत नेत तिच्या हत्या केली, घटनेची CCTV दृष्य व्हायरल
औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून मुलीची गळा चिरून हत्या करण्याची धक्कादायक घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेने औरंगाबाद हादरलं होतं. हत्येनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
औरंगाबादमध्ये कॉलेज तरुणी हत्या प्रकरणातील आरोपी सोहन सिंग याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या लासलगावमधून बहिणीच्या घरातून पोलिसांनी त्यांला अटक केली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तब्बल 17वर करून 19 वर्षीय मुलीचा खून केला होता. दुपारपासून आरोपी फरार होता. पोलिसांनी पथक स्थापन करत आरोपीला अवघ्या 24 तासात अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मृत तरुणीचं नवा ग्रंथी सुखप्रीत कौर असं होतं, आरोपी सोहन सिंग आणि ग्रंथी एकमेकांना ओळखत होते. सोहम सिंग ग्रंथीवर एकतर्फी प्रेम करत होता. ही गोष्ट ग्रंथीने आपल्या कुटुंबियांना सांगितली होती. कुटुंबियांनी आरोपी सोहन सिंगला समजही दिली होती. पण यानंतरही सोहन सिंग तिचा पिच्छा सोडत नव्हता.
आरोपीने मुलीला फरफटत नेलं
शनिवारी ग्रंथी आपल्या मैत्रिणींसोबत महाविद्यालय बसली असताना सोहन सिंग त्या ठिकाणी गेला. त्यानने ग्रंथीशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने बोलण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सोहन सिंगने तिला फरफटत कॅफेच्या बाजूला असलेल्या रिकाम्या प्लॉटच्या दिशेने नेलं. इथे त्याने पुन्हा ग्रंथीशी वाद घातला आणि ग्रंथीला काही कळायच्या आतच आरोपीने तिच्या मानेवरत, पोटावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ला करुन सोहन सिंग तिथून फरार झाला.
सीसीटीव्हीत दृष्य कैद
आरोपी सोहन सिंग ग्रंथीला ओढत नेत असल्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. यात आरोपी सोहन सिंग ग्रंथीला ओढत नेत असल्याचं दिसत आहे. हा प्रकार घडत असताना ग्रंथीच्या मैत्रिणींना आरडाओरडाही केला. पण इतर कोणी मदतीला जाण्याआधीच सोहन सिंगने ग्रंथीवर हल्ला केला होता.