पीएचडी करायची आहे 50 हजार दे! प्राध्यापिकेनेच मागितली खंडणी, Audio क्लिप व्हायरल
औरंगाबाद विद्यापीठात पीएचडीसाठी प्राध्यापिकेनं खंडणी मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पीएचडीसाठी खंडणी मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. विद्यापीठातील प्राध्यापिकेनं विद्यार्थिनीकडून संशोधनासाठी 25 हजार रुपये मागितले. तसेच व्हायवा परीक्षेसाठीही गाईडला 25 हजारांची मागणी केल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे.
विद्यापीठातील संभाषणाची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुलगुरू आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. या ऑडीओ क्लिप समाज माध्यमातून समोर आल्याने खळबळ माजली आहे.
संशोधन करायचं असल्यास 25 हजार आणि व्हायवासाठी 25 हजार असे एकुण 50 हजार रुपयांची मागणी केल्याचं या ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे.
दरम्यान, याप्रकरणी विद्यापीठाचे कुलगुरु प्रमोद येवले यांनी चौकशीचे आदेश दिले असून तोपर्यंत आरोप असणाऱ्या प्रोफेसर उज्ज्वला भंडगे यांना निलंबित करण्याचे आदेश कुलगुरुंनी दिले आहे.
विद्यार्थी संघटना आक्रमक
औरंगाबादेत विद्यापीठ पी एच डी खंडणी प्रकरणी विद्यपीठात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणात कारवाई करावी, कुलगुरूंचं कारभारात लक्ष नाही हे प्रकार वाढले आहेत असे प्रकार सहन करणार नाही असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.