KRK on Baba Siddique: माजी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. कारमध्ये असताना तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर 2-3 राऊंड फायर करण्यात आले. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती. बॉलीवूडपासून राजकारणापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी बाबा सिद्धीकींचे अंतिम दर्शन घेतले. बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांसाठीच हा मोठा धक्का होता. बाबा सिद्धीकी यांच्या अंत्ययात्रेला भर पावसातही मोठी गर्दी पाहायला मिळत होती. असे असताना एक व्यक्त असाही आहे ज्याने हीन दर्जात त्यांच्यावर भाष्य केले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि पोस्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता केआरके याने बाबा सिद्धीकी यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्याच्याच अंगलट येताना दिसतेय. या पोस्टवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.


कोण आहे केआरके?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वत:चा केआरे असा उल्लेख करणाऱ्या अभिनेत्याचे नाव कमाल रशिद खान असे आहे. अभिनेता केआरके हा त्याच्या वादग्रस्त पोस्टसाठी ओळखला जातो. आपल्या स्वभावामुळे तो अनेकदा स्वत:वर अडचणी ओढावून घेतो. पण पुन्हा वादग्रस्ट पोस्ट टाकून खळबळ उडवून देतो.


काय म्हणाला कमाल? 



कमाल रशिद खानने कोणाच्या नावाचा उल्लेख न करता एक ट्वीट केले आहे. 'जशी करणी, तशी भरणी' असे तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो. किती लोकांच्या मालमत्ता बळजबरीने हडप केल्या होत्या कुणास ठाऊक. आज त्या सर्व अत्याचारित लोकांना दिलासा मिळाला असता! असे तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो. बाबा सिद्धीकी यांच्यावर मालमत्तेसंदर्भातील आरोप याआधी करण्यात आले होते. पण तपासात काही समोर आले नव्हते. 


केआरकेच्या ट्विटवर लोकांचा संताप 


केआरकेच्या या ट्विटवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजर्न म्हटले की, 'या काळात तुम्हाला चांगले म्हणता येत नसेल तर वाईटही म्हणू नका.' दुसऱ्या युजरने म्हटले की, या घटनेनंतर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची मला काळजी वाटते', अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने आपल्या कमेंटमधून केआरकेची खिल्ली उडवली. 'मी तुझे दु:ख समजू शकतो, तुला इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले नव्हते का? असा खोचक प्रश्न यूजरने केआरकेला विचारला. केआरकेला सल्ला देताना आणखी एका युजरने कमेंट केली की, 'मृत्यू झाल्यानंतर त्या व्यकतीबद्दल कोणी असे बोलत नाही. हे वाईट आहे. त्यांचा मृत्यू खूप वेदनादायक आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे. बाबा सिद्दीकी 66 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शाहजीन सिद्दीकी, मुलगी झीशान आणि मुलगी अर्शिया सिद्दीकी असा परिवार आहे.