Bageshwar On Tukaram Maharaj: विठ्ठलाच्या भक्तिरसात स्वतःचे जीवन अनमोल बनवणारे संत तुकाराम (Sant Tukaram) हे एक महान अध्यात्मिक आणि वारकरी संत (Warkari Sant) म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) गुरू म्हणून संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं जातं. अशातच आता संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. हे वक्तव्य दुसरं तिसरं कुणी नाही तर चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेल्या बागेश्वर बाबाने केलंय. (Bageshwar dham dhirendra shastri Controversial statement about Sant Tukaram Maharaj latest marathi news)


काय म्हणाले बागेश्वर बाबा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा (Dhirendra Shastri) यांनी उधळली. महाराष्ट्राचे एक महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज मारत होती. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं, बायकोकडून मार खाता, तुम्हाला ** वाटत नाही का?, त्यावेळी महाराज म्हणाले. ही तर देवाची कृपा ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारे बायको मिळाली असती तर मी देवाचा धावा केला नसला, असं बागेश्वर (Bageshwar baba) म्हणाले आहेत.


संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram Maharaj) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केलाय. तर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosle) यांनी देखील निषेध नोंदवला आणि माफी मागण्याची मागणी केली आहे.



केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्वर बाबांनी तुकारामांची माफी मागावी, अशी मागणी भोसले यांनी केलीये. तर मी सुद्धा अध्यात्माला मानते. पण वाईट आहे म्हणून करत नाही. मला वाटतं म्हणून करते त्यामुळे वक्तव्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.


आणखी वाचा - Dhirendra Shastri: बागेश्वर धाम बाबाचं सत्य काय? चमत्कार सिद्ध करा, 30 लाखांचं बक्षीस मिळवा!


दरम्यान, बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराज शास्त्री (Bageshwar dham dhirendra shastri) आपल्या दरबारात चमत्कार करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने बागेश्वर बाबाला खुलं आव्हान दिलं. त्यानंतर त्यांनी ते आव्हान स्विकारलं सुद्धा. मात्र, नंतर त्यांनी पळ काढल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर आता त्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.