Dhirendra Shastri: बागेश्वर धाम बाबाचं सत्य काय? चमत्कार सिद्ध करा, 30 लाखांचं बक्षीस मिळवा!

Dhirendra shastri of bageshwar dham: बाबांवर कडक कारवाई करण्याची मागणी अंनिसनं केली. इतकंच नाही तर बाबांनी चमत्कार सिद्ध केल्यास 30 लाखांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं.

Updated: Jan 20, 2023, 12:26 AM IST
Dhirendra Shastri:  बागेश्वर धाम बाबाचं सत्य काय? चमत्कार सिद्ध करा, 30 लाखांचं बक्षीस मिळवा! title=
Dhirendra Shastri,Bageshwar Dham

Bageshwar Dham: आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा सध्या नव्या वादात सापडलेत. कारण नागपुरात झालेला हा राडा. बागेश्वर बाबा म्हणजे थोतांड असून ते लोकांमध्ये अंधश्रद्धा (Superstition) पसरवत असल्याचा आरोप अंनिसनं केला. अंनिसचा आरोप बाबांना चांगलाच झोंबलाय. त्यामुळे बाबांच्या भक्तांनी नागपुरातील अंनिसच्या कार्यक्रमात जोरदार राडा केला. (Accused of promoting superstition dhirendra shastri of bageshwar dham accepted the challenge of 30 lakhs marathi news)

भक्तांच्या राड्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अंनिसनं बागेश्वर बाबांच्या दिव्य दरबाराला लक्ष्य केलंय. देव-धर्माच्या नावाखाली लोकांची हातोहात फसवणूक केली जातेय. अशा बाबांवर कडक कारवाई करण्याची मागणी अंनिसनं केली. इतकंच नाही तर बाबांनी चमत्कार सिद्ध केल्यास 30 लाखांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे बागेश्वर बाबांनीही हे चॅलेंज (bageshwar dham accepted the challenge) स्वीकारलंय. 

आणखी वाचा - VIDEO : भक्तीत तल्लीन असताना जेव्हा मंदिरात अचानक स्वामी समर्थ प्रकटतात तेव्हा...

बाबांच्या याच दरबारामुळे अंनिसनं त्यांना लक्ष्य केलंय. अंनिसने बाबांवर नेमके काय आरोप (Accused of promoting superstition) केलेत आहेत. चमत्कार सिद्ध करा, असं आव्हान बागेश्वर धाम बाबाला करण्यात आलंय. सध्या नागपुरातील बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर 5 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत नागपुरातील रेशीमबाग मैदानावर रामकथा करत आहेत. त्यानंतर आता वाद पेटताना दिसत आहे.

दरम्यान, ईश्वर असल्याचा, चमत्कार केल्याचा कोणताही दावा नाही. मी संत नाही हेच आमचं डिस्क्लेमर असल्याचं बाबाने सांगितलंय. कथा सोडून पळालो, ही निव्वळ अफवा असल्याचं देखील बाबाने म्हटलंय. आमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. आरोप करणाऱ्यांना फंडिंग केलं जातं असल्याचा आरोप बाबाने (Dhirendra Shastri) केला आहे.